विठ्ठलाची साकारली ४० फुट रांगोळी; चित्रकार अल्पेश घारे यांची कलाकृती | पुढारी

विठ्ठलाची साकारली ४० फुट रांगोळी; चित्रकार अल्पेश घारे यांची कलाकृती

कुडाळ (सिंधुदुर्ग); पुढारी वृत्तसेवा : “आषाढी एकादशी” म्हटल की असंख्य वारकरी आपल्या विठ्ठलाचा नामघोष करीत श्री पांडुरंगाच्या दर्शनाला पायी पंढरीला जायला निघतात. संपुर्ण वारी विठ्ठलमय होऊन जाते. “ठायी ठायी विठ्ठल! ठायी ठायी पंढरी” या पंक्तीप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील चित्रकार अल्पेश घारे यांनी आषाढी एकादशीचे औचित्य साधून श्री पांडूरंगाचे दर्शन देणारी ४० फुट एवढी मोठी रांगोळी शनिवारी म्हापण (ता.वेंगुर्ले) येथील कातळ – दगडावर साकारली आहे. हि रांगोळी साकारायला त्यांना तीन तासांचा अवधी लागला. घारे यांची ही कलाकृती लक्षवेधी ठरली आहे.

साकारालेली ही रांगोळी वारकरी व पंढरीच्या वारीला समर्पित करीत आहे, असे अल्पेश घारे म्हणाले. पांडुरंगा बाबतची अस्सिम भक्ती या ४० फुट रांगोळीच्या माध्यमातून व्यक्त केली आहे असेही ते म्हणाले. कोकणात पाऊस भरपुर, परंतु हि रांगोळी साकारुन पुर्ण होईपर्यंत त्या तीन तासात पावसाचा एकही थेंब आला नाही. हे केवळ त्या पांडूरंगाच्या कृपादृष्टीने झाले असावे. असे सुंदर, मनमोहक विठ्ठलाचे सुमुख दर्शविणाऱ्या रांगोळीची एक छोटी चित्रफित आपण प्रदर्शित करणार असल्याचे घारे यांनी सांगितले.

हेही वाचा

Back to top button