धरणातील पाण्यात उभा असताना फिट आली आणि……… | पुढारी

धरणातील पाण्यात उभा असताना फिट आली आणि.........

जेजुरी : पुढारी वृत्तसेवा

नगर जिल्ह्यातील टाकळी मिया येथून जेजुरीला देवदर्शनासाठी आलेल्या रवींद्र बाळासाहेब भालेराव (वय 34) या तरुण भाविकाचा नाझरे धरणात देवकार्य करताना फिट येऊन पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी (दि. 19) सायंकाळी घडली.

Cannes : आमच्यावरील रेप थांबवा; कान्समध्ये टॉपलेस महिलेकडून युक्रेन युद्धाचा निषेध

नगर जिल्ह्यातील टाकळी मिया या गावातून रवींद्र भालेराव व त्यांचे चार मित्र दुचाकीवरून जेजुरी येथे देवदर्शनासाठी आले होते. दर्शनापूर्वी देवकार्यासाठी हे सर्वजण नाझरे धरणावर गेले. रवींद्र भालेराव यांनी सर्वप्रथम घरातील देवांना कर्‍हा नदीच्या पाण्याने अंघोळ घालण्यासाठी देव ताटात घेऊन नाझरे जलाशयाच्या पाण्यात प्रवेश केला. काही अंतरावर अचानक त्यांना फिट आली.

सातारा : इलेक्ट्रिक बाईकची बॅटरी चार्जिंगला लावताना शॉक लागून युवती ठार

ते पाण्यात पडले व बुडू लागले. त्यांच्याबरोबर आलेल्या मित्रांनी तातडीने पाण्यात जाऊन त्यांना बाहेर काढले. बेशुद्धावस्थेत भालेराव यांना जेजुरीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

Corona active Cases : देशात केवळ ०.०३ टक्के सक्रिय कोरोनाग्रस्त रूग्ण

नाझरे धरणात ज्या ठिकाणी भालेराव पाण्यात पडले, तेथे पाणी कमी होते. मात्र, फिट आल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाला. भालेराव हे विवाहित असून, त्यांना दोन मुले आहेत. त्यांना नेहमी फिट येत असल्याचे त्यांच्या नातेवाइकांनी सांगितले. याप्रकरणी जेजुरी पोलिस स्टेशनचे पोलिस हवालदार शिरीष लोंढे तपास करीत आहेत.

Back to top button