सातारा : इलेक्ट्रिक बाईकची बॅटरी चार्जिंगला लावताना शॉक लागून युवती ठार | पुढारी

सातारा : इलेक्ट्रिक बाईकची बॅटरी चार्जिंगला लावताना शॉक लागून युवती ठार

कराड ; पुढारी वृत्तसेवा इलेक्ट्रिक बाईकची बॅटरी चार्जिंगला लावत असताना शॉक लागून युवती ठार झाली. कराड तालुक्यातील म्होप्रे येथे शुक्रवार ( दि. 20) दुपार[ ही घटना घडली. शिवानी अनिल पाटील (वय 23, रा. म्होप्रे, ता. कराड) असे मृत युवतीचे  नाव आहे.या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, म्होप्रे येथील युवती शिवानी पाटील ही आपल्या इलेक्ट्रिक बाईकची बॅटरी चार्जिंगला लावण्यासाठी गेली. यावेळी  तिला शॉक बसला.  ही बाब लक्षात येताच नातेवाईकांनी तिला त्वरीत उपचारासाठी कराडला रुग्णालयात हलवले. परंतु उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. या घटनेची नोंद कराड तालुका पोलीस ठाण्यात झाली असून, तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल खाडे करत आहेत.

Back to top button