Corona active Cases : देशात केवळ ०.०३ टक्के सक्रिय कोरोनाग्रस्त रूग्ण | पुढारी

Corona active Cases : देशात केवळ ०.०३ टक्के सक्रिय कोरोनाग्रस्त रूग्ण

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : देशात शुक्रवारी दिवसभरात २ हजार ३२३ कोरोनाबाधितांची भर पडली. तर, २५ रुग्णांचा मृत्यू झाला. दरम्यान २ हजार ३४६ रुग्णांनी कोरोनावर मात मिळवली. शनिवारी देशाचा कोरोनामुक्तीदर ९८.७५ टक्के, तर दैनंदिन संसर्गदर ०.४७ टक्के नोंदवण्यात  (Corona active Cases) आला. देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता ४ कोटी ३१ लाख ३४ हजार १४५ पर्यंत पोहचली आहे. यातील ४ कोटी २५ लाख ९४ हजार ८०१ रुग्णांनी कोरोनावर मात मिळवली आहे. तर, १४ हजार ९९६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दुदैवाने आतापर्यंत ५ लाख २४ हजार ३४८ रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे.

(Corona active Cases) देशात आतापर्यंत १९२ कोटी १२ लाख ९६ हजार ७२० डोस देण्यात आले आहेत. यातील ३.२६ कोटी डोस १२ ते १४ वयोगटातील बालकांना देण्यात आले आहेत. तर, खबरदारी म्हणून ३ कोटी २२ लाखांहून अधिक बूस्टर डोस लावण्यात आले आहेत. केंद्र सरकारकडून पुरवण्यात आलेल्या १९३ कोटी ५३ लाख ५८ हजार ८६५ डोस पैकी १६ कोटी ६७ लाख ३९ हजार १५५ डोस अद्यापही राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांकडे शिल्लक आहेत. देशात आतापर्यंत ८४ कोटी ६३ लाख ५४ हजार ७३३ कोरोना तपासण्या करण्यात आल्या आहेत. यातील ४ लाख ९९ हजार ३८२ तपासण्या शुक्रवारी दिवसभरात करण्यात आल्याची माहिती आयसीएमआरकडून देण्यात आली आहे.

हेही वाचलंत का ? 

 

Back to top button