Cannes : आमच्यावरील रेप थांबवा; कान्समध्ये टॉपलेस महिलेकडून युक्रेन युद्धाचा निषेध | पुढारी

Cannes : आमच्यावरील रेप थांबवा; कान्समध्ये टॉपलेस महिलेकडून युक्रेन युद्धाचा निषेध

कान्स; पुढारी ऑनलाईन : सध्या फ्रान्समध्ये कान्स (Cannes) फिल्म फेस्टिव्हलची धूम सुरू आहे. याचीच सर्वत्र जोरदार चर्चा सुरू असताना कान्समध्ये रेड कार्पेटवर आलेली एक टॉपलेस महिला अचानक प्रसिद्धीच्या झोतात आली. तिने युक्रेनच्या ध्वजाच्या रंगात आपले शरीर रंगवून रेड कार्पेटवर प्रवेश केला. आणि आमच्यावर रेप करणे थांबवा, अशा शब्दांत युक्रेन युद्धाचा निषेध नोंदवला. यामुळे काही येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

(Cannes) सुरक्षा रक्षकांनी या महिलेला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. त्याआधीच या महिलेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. महिलेच्या या कृतीमुळे कान्स महोत्सवाच्या कार्यक्रमात गोंधळ उडाला. सुरक्षा रक्षकांनी या महिलेला ताब्यात घेऊन कार्यक्रमातून बाहेर काढले. या महिलेच्या अनोख्या पद्धतीच्या युक्रेन युद्धाच्या निषेधामुळे कान्स फेस्टिव्हलमध्ये सर्वांची तारांबळ उडाली. त्यामुळे काही वेळ कार्यक्रम विस्कळीत झाला.

दरम्यान, युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी गेल्या महिन्यात सांगितले होते की, रशियन सैन्याने व्यापलेल्या भागात शेकडो बलात्काराच्या घटना तपासकर्त्यांना निदर्शनास आल्या आहेत. ज्यात लहान मुलांच्या लैंगिक अत्याचाराचा समावेश आहे. तर, झेलेन्स्कीने मंगळवारी कान्सच्या पार्श्वभूमीवर आपल्या देशाला मदत करण्यासाठी एका व्हिडिओच्या माध्यमातून आवाहन केले होते.

दरम्यान, युक्रेनच्या महिला खासदार मारिया मेझेन्टेवा यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये रशियन लष्कराकडून युक्रेनमधील महिलांवर बलात्कार केले जात असल्याचा धक्कादायक आरोप केला होता. रशियन सैनिक युक्रेनमधील महिलांवर बलात्कार करण्याबरोबरच त्यांचे लैंगिक शोषण करत आहेत. या विकृतीविरोधात आपण शांत बसणार नसून आवाज उठवणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला होता.

मारिया मेझेन्टेवा यांनी सांगितले होते की, किव्ह शहराच्या उत्तरेकडे असणाऱ्या ब्रोव्हरी उपनगरामध्ये एका महिलेवर तिच्या मुलासमोर बलात्कार करण्यात आला. या प्रकरणाची चौकशी संबंधित यंत्रणांकडून केली जात आहे. या प्रकरणामध्ये युक्रेनने संबंधित रशियन लष्करी अधिकाऱ्याविरोधात अटक वॉरंट जारी केले असल्याची माहिती रशियाला दिली होती.

हेही वाचलंत का ? 

Back to top button