सोलापूर : हातोड्याने फोडले दारूचे दुकान नारीशक्‍तीचा दणका ;अवैध व्यावसायिकांमध्ये धास्ती | पुढारी

सोलापूर : हातोड्याने फोडले दारूचे दुकान नारीशक्‍तीचा दणका ;अवैध व्यावसायिकांमध्ये धास्ती

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा
एस.टी. स्टँड येथील मोटे वस्तीतील नारीशक्ती एकत्र आली आणि जी गोष्ट पोलिसांना सांगून, निवेदन देऊन पोलिसांनी केली नाही ते काम मोटे वस्तीतील नारीशक्तीने करुन दाखविले आणि बेकायदेशीर चालणारे दारू दुकान फोडले.

एस.टी. स्टँड येथील मोटे वस्तीत गेल्या अनेक महिन्यांपासून एका घरात दारू दुकान सुरू होते. त्या घरात लोकांना दारू विक्री करण्यात येत होती. त्याचठिकाणी लोकांना दारू पिण्यासाठी बसण्यास जागा दिली जात होती. भरवस्तीत हे दुकान असल्यामुळे दारू पिऊन जाणारे लोक हे समोरच्या बाजूला म्हणजे दुसर्‍याच्या घरासमोर लघुशंका करणे, उलट्या करणे तसेच रहिवासी मुलींची छेडछाड करणे, असे प्रकार वाढत होते. त्यामुळे तेथील नागरिक हे वैतागले होते. तेथील नागरिकांनी याबाबत फौजदार चावडी पोलिस ठाणे व पोलिस आयुक्तालयात तक्रारी अर्ज दाखल केला होता. यात म्हटले होते की, मोटे वस्तीत बेकायदेशीर चालणार्‍या दारूच्या दुकानामुळे तेथील रहिवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.

पोलिस खात्याला निवेदन देऊनसुद्धा पोलिसांनी ते दारूचे दुकान बंद केले नाही. ते काम 22 फेब्रुवारी रोजी मंगळवारी सकाळी मोटे वस्तीत राहणार्‍या व त्रास सहन करणार्‍या महिला एकत्र आल्या व त्यांनी हातोड्याच्या सहाय्याने दारूच्या दुकानाच्या भिंतीवर दणका दिला. दारूचे दुकान फोडून टाकले व स्वत:ला होणार्‍या त्रासापासून स्वत:ची सोडवणूक करुन घेतली.

बाई, येथे माल कोठे मिळतो?

एस.टी. स्टँडजवळील मोटे वस्तीत गेल्या अनेक महिन्यांपासून चालू असलेल्या दारू दुकानामुळे दारूडे लोक रात्री-अपरात्री येत होते. तेथे घरासमोर बसणार्‍या महिलांना, ओ बाई, येथे माल (दारू) कोठे मिळतो, असे विचारत होते. त्या दारू दुकानासमोर राहणार्‍या लोकांच्या घरासमोरच दारू पिलेले लोक हे लघुशंका करत होते व उलट्या करत होते. तेथील महिलांना पाहून अश्‍लील गाणे म्हणून छेडछाड करत होते, अशी माहिती मोटे वस्तीतील महिलांनी दिली.

हेही वाचलत का ?

Back to top button