Twitter : नोकरी टिकवण्यासाठी ट्विटरचे कर्मचारी करतायत दिवसरात्र काम! | पुढारी

Twitter : नोकरी टिकवण्यासाठी ट्विटरचे कर्मचारी करतायत दिवसरात्र काम!

पुढारी ऑनलाईन : ट्विटर मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म एलॉन मस्क यांनी ताब्यात घेतल्यापासून Twitter मध्ये  प्रचंड बदल होत आहेत. मस्क यांच्याकडे ट्विटरची मालकी येताच  महत्त्वाच्या पदांवरील अनेक कर्मचाऱ्यांना ट्विटर सोडावे लागले. मस्क यांनी राबविलेल्या नवीन धोरणांना येथील कर्मचाऱ्यांना देखील सामना करावा लागत आहे. नव्या धोरणांमुळे नोकरी वाचविण्यासाठी ट्विरमधील कर्मचारी रात्र अन् दिवस टार्गेट पूर्ण करण्यामागे धावत आहेत.

ट्विटर स्पेस प्रोडक्ट मॅनेंजर असलेल्या इवान जोन्स यांनी ट्विटर प्रोडक्ट मॅनेंजमेंट डायरेक्टरचा ऑफिसमधील फरशीवर स्लिपींग बॅगमध्ये झोपलेला फोटो ट्विट केला आहे. हा फोटो शेअर करत जॉन्स यांनी ‘आपल्या बॉसकडून जेव्हा काही अपेक्षा असतात तेव्हा…’ असा मेसेज लिहित आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत.

हाच फोटो ट्विटच्या प्रोडक्ट मॅनेजमेंट डायरेक्टर एस्थर क्रॉफर्ड यांनी आपल्या मॅनेंजरचे ट्विट रिट्विट करत ‘जेव्हा तुमची टीम डेडलाइन पूर्ण करण्यासाठी २४ तास प्रयत्न करत असता तेव्हा तुम्ही, जिथे काम करता तिथेच झोपता’ (When your team is pushing round the clock to make deadlines sometimes you #SleepWhereYouWork) असे म्हणत कामाप्रती असलेले समर्प‍‍ण सांगितले आहे. या फोटोवरून ट्विटरमधील सुरू असलेल्या बदलांचा अंदाज करता येऊ शकेल.

आठवड्याचे सातही दिवस १२ तास काम

एका रिपोर्टनुसार, , ट्विटरच्या काही इंजनिअर्सना आठवड्याच्या सुट्टी दिवशीही प्रोजेक्टवर काम करण्यासाठी सांगण्यात आले आहे. ट्विटरमधील कर्मचाऱ्यांनी आठवड्याचे सातही दिवस १२ तास काम करण्यासाठी सांगण्यात आले आहे. म्हणजेच ट्विटरच्या कर्मचाऱ्यांना कंपनीने दिलेल्या प्रकल्प मुदतीत आठवड्याचे ८४ तास काम करावे लागणार आहे.

हेही वाचा:

Back to top button