Twitter : युजर्ससाठी मोठी बातमी! ट्विटरचे संचालक मंडळ बरखास्त | पुढारी

Twitter : युजर्ससाठी मोठी बातमी! ट्विटरचे संचालक मंडळ बरखास्त

पुढारी ऑनलाईन डेस्क : ट्विटरशी संबंधित एक मोठी माहिती सध्या समोर आली आहे. ट्विटर या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मचे संपूर्ण संचालक बोर्ड काढून टाकण्यात आले आहे. संचालक मंडळ बरखास्त केल्यानंतर ट्विटर या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचे एलन मस्क हे एकमेव संचालक बनल्याचे स्पष्ट झाले आहे. कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणात होत असलेल्या टाळेबंदीच्या दाव्याला मस्क यांनी नाकारले होते. त्यानंतर काही तासांनंतर ही माहीती समोर आली आहे. (Twitter)

एलन मस्क यांच्या या निर्णयानंतर, ट्विटरच्या संचालक मंडळाचे पूर्वीचे सर्व सदस्य आता संचालक राहीलेले नाहीत. नुकत्याच एका अहवालात नमूद करण्यात आले होते की, मस्क यांना नोकरीवरून काढलेल्या कर्मचार्‍यांना स्टॉक अनुदान देणे टाळायचे आहे. यासाठी 1 नोव्हेंबर ही तारीख अंतिम मुदत म्हणून निश्चित करण्यात आली आहे.(Twitter)

ट्विटर या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचे नवीन मालक बनल्यानंतर एलन मस्क हे वेगाने निर्णय घेताना दिसून येत आहे. कंपनीचे भारतीय वंशाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पराग अग्रवाल यांच्यासह अनेक अधिकाऱ्यांना काढून टाकण्यात आले. त्यानंतर आता मस्क यांनी कंपनीच्या सर्व संचालक मंडळ देखील बरखास्त केले आहे. ते आता इलॉन मस्क हे ट्विटरचे एकमेव संचालक आहेत.

एलन मस्क यांनी ट्विटर खरेदी केल्यानंतर पराग अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनूसार, लोकांना कामावरून काढायचं की नाही हे अद्याप नियोजित नाही, पण जेव्हा हा संपूर्ण व्यवहार पूर्ण होईल, त्यावेळी काय होईल याबद्दल कोणतंही भाष्य करू शकत नाही. कंपनी आता मस्क यांच्या हातात आहेत.

हेही वाचा

Back to top button