T20 WC Team India : टी-20 वर्ल्डकपसाठी लवकरच टीम इंडियाची घोषणा! ‘या’ 15 खेळाडूंना मिळणार जागा | पुढारी

T20 WC Team India : टी-20 वर्ल्डकपसाठी लवकरच टीम इंडियाची घोषणा! ‘या’ 15 खेळाडूंना मिळणार जागा

पुढारी ऑनलाईन डेस्क : आयसीसी पुरुष टी-20 विश्वचषक स्पर्धा सुरू होण्यासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. 1 जूनपासून अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये खेळवल्या जाणा-या या स्पर्धेसाठी भारतीय संघाची लवकरच घोषणा होणार आहे. यासाठी अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय निवड समितीची बैठक या महिन्याच्या शेवटच्या तारखेला (30 एप्रिल) किंवा पुढील महिन्याच्या पहिल्या दिवशी होऊ शकते.

टी-20 विश्वचषकासाठी संघ घोषित करण्यासाठी आयसीसीने 1 मे ही अंतिम मुदत दिली आहे. म्हणजेच या तारखेपर्यंत सर्व 20 देशांना आपापले संघ निवडायचे आहेत. दरम्यान, भारतीय संघात कोणाकोणाला संधी मिळणार याकडे सर्वाच्या नजरा खिळल्या आहेत.

पाच फलंदाज

कर्णधार रोहित शर्मासह, विराट कोहली आणि नंबर-1 चा टी-20 फलंदाज सूर्यकुमार यादव यांचे विश्वचषक संघातील स्थान जवळपास निश्चित झाले आहे. सलामीवीर यशस्वी जैस्वाल आणि रिंकू सिंह यांनाही विश्वचषक खेळण्याची संधी मिळू शकते. यशस्वीने अलीकडच्या काळात उत्कृष्ट कामगिरी केली आहे, तर रिंकूनेही फिनिशरची भूमिका उत्तमरित्या पार पाडली आहे.

दोन विकेटकीपर

भारतीय संघाचे यष्टीरक्षक म्हणून ऋषभ पंत आणि संजू सॅमसन यांना संधी मिळू शकते. आयपीएल 2024 मधून पंतने टी-20 पुनरागमन केले आहे. त्याने काही स्फोटक खेळी खेळून निवडकर्त्यांचे पुन्हा लक्षवेधले आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये विकेटच्या मागे पंतची कामगिरीही उत्कृष्ट ठरली आहे. दुसरीकडे संजू सॅमसनला दुसरा यष्टिरक्षक म्हणून जागा मिळू शकते. संजू सध्याच्या आयपीएल हंगामात राजस्थान रॉयल्ससाठी (RR) फलंदाजीत चमकदार कामगिरी करत आहे.

तीन अष्टपैलू

अष्टपैलू म्हणून हार्दिक पंड्या संघात प्रवेश करू शकतो. तो यंदाच्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स (MI) चे नेतृत्व करत आहे. तर फिरकी गोलंदाजीतील अष्टपैलू रवींद्र जडेजाचाही प्रवेश निश्चित मानला जात आहे. अक्षर पटेलपेक्षा जडेजाला प्राधान्य दिले जाऊ शकते. मिडीयम पेसर आणि फलंदाजी करताना उत्तुंग षटकार मारण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या शिवम दुबेलाही संघात स्थान मिळू शकते.

दोन फिरकीपटू

कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहल यांचा विश्वचषक संघात विशेषज्ञ फिरकी गोलंदाज म्हणून समावेश केला जाऊ शकतो. लेग-स्पिनर चहल हा टी-20 क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज आहे आणि तो आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी करत आहे. टी-20 विश्वचषक वेस्ट इंडिज आणि यूएसएमध्ये होणार असल्याने संथ खेळपट्ट्यांवर कुलदीप आणि चहलची भूमिका महत्त्वाची ठरू शकते.

तीन वेगवान गोलंदाज

जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंगचे जलद गोलंदाजी युनिटमध्ये स्थान निश्चित झालेले दिसते. त्याचबरोबर तिसरा स्पेशालिस्ट वेगवान गोलंदाज म्हणून मोहम्मद सिराजचाही समावेश केला जाऊ शकतो. सध्याच्या आयपीएल मोसमात सिराज नक्कीच महागडा ठरला आहे. मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याची कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे.

टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी संभाव्य संघ :
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, युजवेंद्र चहल, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), रिंकू सिंह, मोहम्मद सिराज.

‘हे’ खेळाडू देखील निवडीचे दावेदार

केएल राहुल, ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, इशान किशन, श्रेयस अय्यर, मयंक यादव (सध्या जखमी), रियान पराग, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, मुकेश कुमार.

यावेळी टी-20 विश्वचषक बाद फेरीसह एकूण 3 टप्प्यात खेळवला जाईल. सर्व 20 संघ 4 गटात विभागले गेले आहेत. प्रत्येक गटात 5-5 संघ असतील. टॉप-2 संघ सुपर-8 मध्ये प्रवेश करतील. यानंतर, सर्व 8 संघ प्रत्येकी 4 च्या 2 गटात विभागले जातील. सुपर-8 टप्प्यात दोन्ही गटातील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतील. दोन संघ उपांत्य फेरीच्या सामन्यांद्वारे अंतिम फेरीत प्रवेश करतील.

टी-20 विश्वचषक गट :

ए गट : भारत, पाकिस्तान, आयर्लंड, कॅनडा, अमेरिका
बी गट : इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, नामिबिया, स्कॉटलंड, ओमान
सी गट : न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, अफगाणिस्तान, युगांडा, पापुआ न्यू गिनी
डी गट : दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, बांगलादेश, नेदरलँड, नेपाळ

टी-20 विश्वचषकातील सर्व 55 सामन्यांचे वेळापत्रक :

1. शनिवार, 1 जून : यूएसए विरुद्ध कॅनडा, डॅलस
2. रविवार, 2 जून : वेस्ट इंडीज विरुद्ध पापुआ न्यू गिनी, गयाना
3. रविवार, 2 जून : नामिबिया विरुद्ध ओमान, बार्बाडोस
4. सोमवार, 3 जून : श्रीलंका विरुद्ध दक्षिण आफ्रिका, न्यूयॉर्क
5. सोमवार, 3 जून : अफगाणिस्तान विरुद्ध युगांडा, गयाना
6. मंगळवार, 4 जून : इंग्लंड विरुद्ध स्कॉटलंड, बार्बाडोस
7. मंगळवार, 4 जून : नेदरलँड विरुद्ध नेपाळ, डॅलस
8. बुधवार, 5 जून : भारत विरुद्ध आयर्लंड, न्यूयॉर्क
9. बुधवार, 5 जून : पापुआ न्यू गिनी विरुद्ध युगांडा, गयाना
10. बुधवार, 5 जून : ऑस्ट्रेलिया विरुद्ध ओमान, बार्बाडोस
11. गुरुवार, 6 जून : यूएसए विरुद्ध पाकिस्तान, डॅलस
12. गुरुवार, 6 जून : नामिबिया विरुद्ध स्कॉटलंड, बार्बाडोस
13. शुक्रवार, 7 जून : कॅनडा विरुद्ध आयर्लंड, न्यूयॉर्क
14. शुक्रवार, 7 जून : न्यूझीलंड विरुद्ध अफगाणिस्तान, गयाना
15. शुक्रवार, 7 जून : श्रीलंका विरुद्ध बांगलादेश, डॅलस
16. शनिवार, 8 जून : नेदरलँड विरुद्ध दक्षिण आफ्रिका, न्यूयॉर्क
17. शनिवार, 8 जून : ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड, बार्बाडोस
18. शनिवार, 8 जून : वेस्ट इंडिज विरुद्ध युगांडा, गयाना
19. रविवार, 9 जून : भारत विरुद्ध पाकिस्तान, न्यूयॉर्क
20. रविवार, 9 जून : ओमान विरुद्ध स्कॉटलंड, अँटिग्वा
21. सोमवार, 10 जून : दक्षिण आफ्रिका विरुद्ध बांगलादेश, न्यूयॉर्क
22. मंगळवार, 11 जून : पाकिस्तान विरुद्ध कॅनडा, न्यूयॉर्क

Back to top button