MI vs CSK : चेन्नईचे मुंबईला विजयासाठी 207 धावांचे लक्ष्य | पुढारी

MI vs CSK : चेन्नईचे मुंबईला विजयासाठी 207 धावांचे लक्ष्य

पुढारी ऑनलाईन डेस्क : ऋतुराज गायकवाड-शिवम दुबे यांच्यातील 95 धावांची भागिदारी आणि शेवटच्या ओव्हरमध्ये धोनीने केलेल्या आतषबाजीच्या जोरावर चेन्नईने 4 विकेट गमावून 206 धावा केल्या. गोलंदाजीमध्ये मुंबईच्या हार्दिकने 2 तर, श्रेयस गोपाल आणि कोएत्झी यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली. सामन्यात विजय मिळवण्यासाठी मुंबईसमोर 207 धावांचे लक्ष्य आहे (MI vs CSK)

चेन्नईची फलंदाजी

आयपीएलच्या 29व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने मुंबई इंडियन्सविरुद्ध 20 षटकात 4 विकेट गमावून 206 धावा केल्या. या सामन्यात ऋतुराज गायकवाड आणि शिवम दुबे यांनी अर्धशतके झळकावली. चेन्नईची सुरुवात चांगली झाली नाही. सलामीला फलंदाजीला आलेला अजिंक्य रहाणे केवळ पाच धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याचवेळी रचिन रवींद्रलाही २१ धावा करता आल्या. यानंतर दुबे आणि गायकवाड यांच्यात तिसऱ्या विकेटसाठी 90 धावांची भागीदारी झाली, जी हार्दिक पांड्याने मोडली.

त्याने सीएसकेच्या कर्णधाराला 150 धावांवर बाद केले. ऋतुराजने या सामन्यात 40 चेंडूंचा सामना करत 69 धावा केल्या. यादरम्यान त्याच्या बॅटमधून पाच चौकार आणि पाच षटकार आले. संघाला चौथा धक्का डॅरिल मिशेलच्या रूपाने बसला. तो १७ धावा करून माघारी परतला. शेवटच्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर पंड्याने त्याला नबीकरवी झेलबाद केले. सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या धोनीने शेवटच्या चार चेंडूत 20 धावा केल्या. त्याने लागोपाठ तीन चेंडूत तीन षटकार ठोकले. या काळात त्याचा स्ट्राइक रेट 500 होता. धोनीला मैदानावर पाहून चाहते वेडे झाले. या सामन्यात मुंबईकडून हार्दिक पांड्याने दोन तर गेराल्ड आणि गोपाल यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.

चेन्नईला तिसरा धक्का; ऋतुराज गायकवाड बाद

हार्दिक पांड्याने ऋतुराज गायकवाडला बाद करत चेन्नईला तिसरा फलंदाज बाद केला. तो 69 धावा करून परतला. कर्णधाराने शिवम दुबेसोबत त्याने तिसऱ्या विकेटसाठी 95 धावांची मोठी भागीदारी केली

ऋतुराज पाठोपाठ शिवम दुबेने झळकावले अर्धशतक

चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला शिवम दुबेनेही दमदार फलंदाजी करत अर्धशतक झळकावले. या खेळीमध्ये त्याने पाच चौकार आणि पाच षटकार लागले आहेत.

ऋतुराज गायकवाडने झळकावले अर्धशतक

तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला कर्णधार ऋतुराज गायकवाड दमदार फॉर्ममध्ये फलंदाजी करत आहे. सामन्यात त्याने दमदार फलंदाजी करत 33 चेंडूत अर्धशतक झळकावले. त्याच्यासह शिवम दुबेही जबरदस्त खेळी करत आहे.

चेन्नईला दुसरा धक्का; रचिन रवींद्र बाद

श्रेयस गोपालने चेन्नई सुपर किंग्जला दुसरा धक्का दिला. आठव्या ओव्हरमध्ये त्याने रचिन रवींद्रला विकेटकीपर इशान किशन करवी झेलबाद केले. रवींद्रने आपल्या खेळीत दोन चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 21 धावा केल्या.

पॉवर प्लेमध्ये चेन्नई 1 बाद 48

नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना चेन्नईची सुरूवात खऱाब झाली. डावाच्या दुसऱ्या ओव्हरमध्ये अजिंक्य रहाणेच्या रूपात चेन्नईला पहिला धक्का बसला. त्याला मुंबईचा गोलंदाज जेराल्ड कोएत्झीने हार्दिक पंड्याकरवी झेलबाद केले. रहाणेला आपल्या खेळीत 8 बॉलमध्ये 5 धावांची खेळी करता आली. यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या ऋतुराज गायकवाडने रचिन रवींद्रसोबत दुसऱ्या विकेटसाठी 40 धावांची भागिदारी केली.

चेन्नईला पहिला झटका; अजिंक्य रहाणे बाद

सामन्याच्या दुसऱ्या ओव्हरमध्ये अजिंक्य रहाणेच्या रूपात चेन्नई पहिला धक्का बसला. त्याला मुंबईचा वेगवान गोलंदाज जेराल्ड कोएत्झीने हार्दिक पंड्याकरवी झेलबाद केले. रहाणेला आपल्या खेळीत 8 बॉलमध्ये 5 धावांची खेळी करता आली.

सामन्यात कोणता संघ मारणार बाजी ?

कट्टर प्रतिस्पर्धी असलेले मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात स्पर्धेतील 29 वा सामना मुंबईचे होमग्रांउड असलेल्या वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात येत आहे. हे दोन्ही संघ एकमेकाचे प्रतिस्पर्धी असले तरी यावेळी रोहित शर्मा विरुध्द महेंद्रसिंग धोनी असा सामना यंदा पाहायला मिळणार नाही. कारण दोन्ही संघानी त्यांच्या संघाची कमान नव्या कर्णधारांच्याकडे सोपवली आहे.

मुंबई – चेन्नई हेड टू हेड

नव्या कर्णधारांच्या नेतृत्वात सामन्यात कोण बाजी मारणार याकडे सर्वांच्या नजरा लागून आहेत. दोन्ही संघामध्ये एकूण 36 सामने झालेले आहेत. यामध्ये मुंबईने 20 तर चेन्नईने 16 सामन्यात बाजी मारली आहे. गुणतालिकेत सहा गुणांसोबत चेन्नई तिसऱ्या तर चार गुणांसोबत सातव्या क्रमांकावर आहे. या हंगामात मुंबईने हार्दिकच्या नेतृत्वात 5 सामन्यात 3 सामन्यात हार तर दोन सामन्यात सलग विजय मिळवले आहेत. तर चेन्नईने पाच सामन्यात तीन विजय मिळवून गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहेत. (MI vs CSK)

हेही वाचा :

Back to top button