IPL GT vs SRH : हैदराबादचे गुजरातसमोर विजयासाठी १६३ धावांचे लक्ष्‍य | पुढारी

IPL GT vs SRH : हैदराबादचे गुजरातसमोर विजयासाठी १६३ धावांचे लक्ष्‍य

पुढारी ऑनलाईन डेस्‍क :  सामन्यात हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. २० षटकात हैदराबादने ८ गडी गमावत १६२ धावा करत विजयासाठी गुजरातसमोर १६३ धावांचे लक्ष्‍य ठेवले. (IPL GT vs SRH)

पाचव्‍या षटकात हैदराबादला पहिला धक्‍का

हैदराबादने आपल्‍या डावाची सावध सुरुवात केली. सनरायझर्स हैदराबादला पहिला धक्का पाचव्या षटकात 34 धावांवर बसला. मयंक अग्रवालला अजमतुल्ला उमरझाईने दर्शन नळकांडेच्या हाती झेलबाद केले. 17 चेंडूत 16 धावा करून तो बाद झाला. त्याने आपल्या खेळीत दोन चौकार मारले. डावातील पहिली सहा षटकांमध्‍ये ( पॉवरप्ले) हैदराबादने १ गडी गमावत ५६ धावा केल्‍यायानंतर सातव्या षटकात  ५८ धावांवर फिरकीपटू नूर अहमदने हैदराबादला दुसरा धक्‍का दिला. त्‍याने  ट्रॅव्हिस हेडला क्लीन बोल्ड केले.

सावरलेला डाव गडगडला

10 षटकांनंतर सनरायझर्स हैदराबादने तीन गडी गमावून 74 धावा केल्या. मोहित शर्माने अभिषेक शर्माला शुभमन गिलकरवी झेलबाद केले. त्याला 20 चेंडूंत 2 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 29 धावा केल्‍या. हैदराबादने 13 षटकांत 3 गडी गमावत 104 धावा केल्‍या.  १४ व्‍या षटकात सनरायझर्सला 108 धावांवर चौथा धक्का. २४ धावांवर खेळणार्‍या क्‍लासेनला गुजरातचा फिरकीपटू रशीद खानने क्‍लीन बोल्‍ड केले. सनरायझर्स हैदराबादला 15व्या षटकात 114 धावांवर पाचवा धक्का बसला. एडन मार्करामला उमेश यादवने राशिद खानकरवी झेलबाद केले. त्याने 19 चेंडूत 17 धावा केल्‍या. समद याने उमेशच्या लागोपाठ दोन चेंडूंवर दोन चौकार मारले. 15 षटकांनंतर हैदराबादची धावसंख्या पाच गड्यांच्या मोबदल्यात 122 धावा इतकी हाेती. हैदराबादने 13 षटकांत 3 गडी गमावत 104 धावा केल्‍या होत्‍या. मात्र पुढील चार षटकात गुजरातच्‍या गाेलंदाजांनी कमबॅक केले.  चार षटकात दाेन बळी घेत  केवळ ३३ धावा दिल्‍या. (IPL GT vs SRH)

अखेरच्‍या षटकात हैदराबादने तीन  विकेट गमावल्‍या

हैदराबाद संघाने 20 व्या षटकात तीन विकेट गमावल्या. शेवटचे षटक टाकण्यासाठी मोहित शर्मा आला. या षटकात त्याने फक्त तीन धावा दिल्या. तसेच दोन विकेट्स घेतल्या. अखेरच्या चेंडूवर अब्दुल समद धावबाद झाला. मोहितने एकूण तीन विकेट घेतल्या. त्याचवेळी समदने हैदराबादसाठी सर्वाधिक धावा केल्या. त्याने 14 चेंडूत 29 धावांची खेळी खेळली. अभिषेकने 20 चेंडूत 29 धावांची खेळी केली. संघाने 20 षटकांत आठ गडी गमावून 162 धावा केल्या. सनरायझर्स हैदराबादने गुजरात टायटन्ससमोर 163 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

गुजरातच्‍या संघात दाेन बदल

आजच्‍या सामन्‍यात सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सने प्लेइंग-11 मध्ये कोणताही बदल केलेला नाही. त्याचवेळी गुजरातचा कर्णधार शुभमन गिल म्हणाला की, नाणेफेक जिंकली असती तर प्रथम गोलंदाजी केली असती. शुभमनने प्लेइंग-11 मध्ये दोन बदल केले आहेत. वेगवान गोलंदाज स्पेन्सर जॉन्सनच्या जागी चायनामन स्पिनर नूर अहमद तर साई किशोरच्या जागी दर्शन नळकांडे यांना संधी देण्‍यात आली आहे.

गुजरात टायटन्स संघ : शुभमन गिल (कर्णधार), ऋद्धिमान शाह (यष्टीरक्षक), अजमतुल्ला ओमरझाई, डेव्हिड मिलर, विजय शंकर, राहुल तेवतिया, रशीद खान, नूर अहमद, दर्शन नळकांडे, उमेश यादव, मोहित शर्मा. प्रभावशाली खेळाडू: साई सुदर्शन, साई किशोर, शरथ बीआर, मानव सुथार, अभिनव मनोहर.

सनरायझर्स हैदराबादः मयंक अग्रवाल, ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, शाहबाज अहमद, पॅट कमिन्स (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, मयंक मार्कंडे, जयदेव उनाडकट. प्रभावशाली खेळाडू: उमरान मलिक, नितीश रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, ग्लेन फिलिप्स, उपेंद्र यादव.

Back to top button