INDvsSA U19 WC Semi Final : अंडर 19 वर्ल्डकपच्या फायनलमध्ये टीम इंडियाची धडक! | पुढारी

INDvsSA U19 WC Semi Final : अंडर 19 वर्ल्डकपच्या फायनलमध्ये टीम इंडियाची धडक!

पुढारी ऑनलाईन डेस्क : IND vs SA U19 : 19 वर्षांखालील विश्वचषकाच्या पहिल्या उपांत्य फेरीत यजमान दक्षिण आफ्रिकेने भारताला 245 धावांचे लक्ष्य दिले आहे. प्रत्युत्तरात भारतीय संघाने 47 षटकांत 6 गडी गमावून 226 धावा केल्या आहेत.

राज लिंबानीचा षटकार

नवीन फलंदाज राज लिंबानीने 48व्या षटकातील 5व्या चेंडूवर षटकार ठोकला आणि शेवटच्या चेंडूवर 2 धावा केल्या. येथून भारताला 12 चेंडूत 9 धावांची गरज आहे.

सचिनचे शतक हुकले

दक्षिण आफ्रिकेला आणखी एक विकेट मिळाली. क्वीन माफाकाने सचिन धसला (96 धावा) 43व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर डेव्हिड टीगरकरवी झेलबाद केले. त्याने सचिन आणि उदय यांच्यातील 171 धावांची भागीदारी तोडली.

सचिन-उदयचे 150 धावांची भागीदारी

सचिन धस आणि उदय सहारन यांच्यात 5व्या विकेटसाठी 150 धावांची भागीदारी आहे.

सहारन स्पर्धेतील सर्वाधिक धावा करणारा खेळाडू

भारतीय कर्णधार उदय सहारन अंडर-19 विश्वचषकाच्या चालू हंगामातील सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे. त्याने अर्धशतक झळकावले आहे.

उदय-सचिनची अर्धशतकी भागीदारी

32 धावांत चौथी विकेट गमावल्यानंतर कर्णधार उदय सहारन आणि सचिन धस या जोडीने भारताचा विस्कळीत डाव सांभाळला. दोघांनी अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली.

भारताचे अर्धशतक

भारतीय संघाने 18व्या षटकात 50 धावांचा टप्पा ओलांडला. 18 षटकांनंतर संघाची धावसंख्या 4 बाद 56 होती.

भारताच्या 15 षटकात 41 धावा

भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. संघाने 15 षटकात 2.7 च्या धावगतीने केवळ 41 धावा केल्या. या कालावधीत केवळ 3 चौकार मारले गेले.

भारताची टॉप ऑर्डर अपयशी

उपांत्य फेरीच्या सामन्यात 245 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाची टॉप ऑर्डर फ्लॉप ठरली. संघाने 32 धावांवर चौथी विकेट गमावली. सलामीवीर आदर्श सिंग 0, अर्शीन कुलकर्णी 12, मुशीर खान 4 आणि प्रियांशू मोलिया 5 धावा करून बाद झाले आहेत.

पॉवरप्लेमध्ये भारताची अवस्था बिकट

पॉवरप्लेमध्ये भारतीय फलंदाज संघर्ष करताना दिसले. संघाने पहिल्या 10 षटकात 26 धावांत टॉप-3 विकेट्स गमावल्या. दक्षिण आफ्रिकेकडून ट्रिस्टन लुसने दोन बळी घेतले, तर क्वीन माफाकाला पहिल्या चेंडूवर यश मिळाले.

25 धावांवर तिसरी विकेट

भारताने 10व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर 25 धावांवर तिसरी विकेट गमावली. त्रिस्टन लुसने अर्शीन कुलकर्णीला (12 धावा) कर्णधार जुआन जेम्सकरवी झेलबाद केले.

भारताने दुसरी विकेटही गमावली

चौथ्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर भारतीय संघाला दुसरा धक्का बसला. ट्रिस्टन लुसने मुशीर खानला (4 धावा) कर्णधार जुआन जेम्सकरवी झेलबाद केले. यावेळी टीम इंडियाला दुहेरी आकडाही पार करता आला नव्हता.

तत्पूर्वी, अंडर-19 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेने भारतासमोर 245 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना द. आफ्रिकेने 50 षटकांत 7 गडी गमावून 244 धावा केल्या. त्यांच्या लुआन-ड्रे प्रिटोरियस (76 धावा) आणि रिचर्ड सेलेटस्वेन (64 धावा) यांनी अर्धशतके झळकावली. भारताकडून राज लिंबानीने तीन तर मुशीर खानला दोन बळी मिळाले. सौम्या पांडे आणि नमन तिवारीला 1-1 विकेट मिळाली.

दक्षिण आफ्रिकेची सुरुवात खराब झाली. त्यांनी 46 धावांत दोन विकेट गमावल्या. त्यानंतर प्रिटोरियसने सेलेटस्वेनच्या साथीने तिसऱ्या विकेटसाठी 72 धावांची भागीदारी केली. प्रिटोरियसने 102 चेंडूंत सहा चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने 76 धावांची खेळी केली. त्यानंतर ऑलिव्हर व्हाईटहेडने 22, डेव्हन मरायसने तीन आणि कर्णधार युआन जेम्सने 24 धावा जोडल्या.

सेलेटस्वेनने एक टोक सांभाळले आणि अर्धशतक झळकावले. तो 100 चेंडूत चार चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 64 धावा करून बाद झाला. त्यानंतर रिले नॉर्टन सात तर ट्रिस्टन लुस 12 चेंडूत एक चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 23 धावा करून नाबाद राहिला. भारताकडून राज लिंबानी याने सर्वाधिक तीन बळी घेतले. मुशीर खानने दोन विकेट घेतल्या. नमन तिवारी आणि सौमी पांडे यांनी प्रत्येकी एक विकेट मिळाली.

सेलेट्सवेन बाद

47 व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर द. आफ्रिकेने सहावी विकेट गमावली. नमन तिवारीने अर्धशतक पूर्ण करणाऱ्या रिचर्ड सेलेटस्वेनला (64 धावा) प्रियांशू मोलिया करवी झेलबाद केले.

द. आफ्रिकेने 200 चा टप्पा ओलांडला

द. आफ्रिकेने 200 धावसंख्येचा टप्पा ओलांडला आहे. या धावसंख्येमध्ये सेलेटस्वेन आणि प्रिटोरियस यांच्या अर्धशतकी खेळीचे महत्त्वाचे योगदान आहे.

द. आफ्रिकेची 5 वी विकेट

दक्षिण आफ्रिकेने 5वी विकेट गमावली आहे. उपकर्णधार सौम्या पांडेने देवन मरैसला (3 धावा) मुरुगन अभिषेककरवी झेलबाद केले.

सेलेटस्वेनचे 90 चेंडूत अर्धशतक

रिचर्ड सेलेटस्वेनने आपले अर्धशतक पूर्ण केले आहे. त्याने 90 चेंडूत 50 धावांचा आकडा गाठला. त्याने प्रिटोरियससोबत 73 धावांची भागीदारी केली.

द. आफ्रिका दीडशे पार

द. आफ्रिकेची धावसंख्या 150 च्या पुढे गेली आहे. संघाचे तीन फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतले आहेत.

प्रिटोरियस बाद

भारताला तिसरे यश मुशीर खानने मिळवून दिले. त्याने 31व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर अर्धशतकवीर प्रिटोरियसला अभिषेककरवी झेलबाद केले. प्रिटोरियस 102 चेंडूत 76 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.

दक्षिण आफ्रिकेचे शतक

दक्षिण आफ्रिकेच्या संघाने 100 धावांचा टप्पा ओलांडला आहे. प्रिटोरियसने 26व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर षटकार ठोकला आणि संघाची धावसंख्या 100 च्या पुढे नेली.

प्रिटोरियसचे अर्धशतक

दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज लुआन-ड्रे प्रिटोरियसने आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने 59 चेंडूत अर्धशतक झळकावले. या स्पर्धेतील त्याचे हे तिसरे अर्धशतक आहे.

दक्षिण आफ्रिकेचे अर्धशतक

दक्षिण आफ्रिकेने दहाव्या षटकात आपले अर्धशतक पूर्ण केले. प्रिटोरियसने मुरुगन अभिषेकविरुद्ध लाँग लेगच्या दिशेने षटकार मारून संघाची धावसंख्या 50 धावांच्या पुढे नेली.

डेव्हिड टीगर शून्यावर बाद

राज लिंबानीने 9व्या षटकाचा पहिला चेंडूवर डेव्हिड टीगरला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. लिंबानीने गुड लेंथवर टाकलेल्या इन-स्विंगरने टीगर पुरता फसला आणि खाते न उघडता आला तसा माघारी परतला.

स्टीव्ह स्टॉक 17 धावा करून बाद

राज लिंबानीने भारताला पहिले यश 5व्या षटकात मिळवून दिले. षटकाच्या पाचव्या चेंडूवर त्याने स्टीव्ह स्टॉकला झेलबाद केले. स्टॉक 17 चेंडूत 14 धावा करून बाद झाला. त्याने या खेळीत 2 चौकार आणि 1 षटकार मारला.

पहिल्याच षटकात केवळ एक धाव

यष्टिरक्षक लुआन-ड्रे प्रिटोरियस आणि संघाचा सर्वाधिक धावा करणारा स्टीव्ह स्टॉक यांनी दक्षिण आफ्रिकेच्या डावाला सुरुवात केली. भारताकडून राज लिंबानी पहिले षटक टाकले. त्याने षटकात फक्त एक धाव दिली.

नमन तिवारीला संधी

भारतीय संघाचा कर्णधार उदय सहारनने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. नमन तिवारीचे संघात पुनरागमन झाले आहे. (IND vs SA U19)

दोन्ही संघांचे प्लेइंग-11

दक्षिण आफ्रिका : युआन जेम्स (कर्णधार), क्वेना माफाका, दिवान माराईस, नकोबानी मोकोएना, रिले नॉर्टन, लुआन-ड्रे प्रिटोरियस (विकेटकीपर), रिचर्ड सेलेट्सवेन, स्टीव्ह स्टोक्स, डेव्हिड टेगर, ऑलिव्हर व्हाइटहेड, ट्रिस्टन लुस.

भारत : उदय सहारन (कर्णधार), अर्शिन कुलकर्णी, आदर्श सिंग, सचिन दास, प्रियांशू मोलिया, मुशीर खान, अरावेली अवनीश, सौम्य कुमार पांडे, मुरुगन अभिषेक, राज लिंबानी, नमन तिवारी.

हेही वाचा :

Back to top button