Uniform Civil Code Uttarakhand : उत्तराखंड विधानसभेत UCC विधेयक सादर; लग्न, घटस्फोट आणि वारसाबाबतचे नियम बदलणार | पुढारी

Uniform Civil Code Uttarakhand : उत्तराखंड विधानसभेत UCC विधेयक सादर; लग्न, घटस्फोट आणि वारसाबाबतचे नियम बदलणार

पुढारी ऑनलाईन डेस्क : उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी आज विधानसभेत “समान नागरी संहिता 2024” (Uniform Civil Code Uttarakhand 2024) विधेयक सादर केले. विधेयकावर चर्चेची मागणी करत विधानसभेत गदारोळ झाला. दरम्यान, विरोधकांच्या गदारोळामुळे सभागृहाचे कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले.

उत्तराखंड विधानसभेच्या अधिवेशनाचा मंगळवारी दुसरा दिवस आहे. राज्याच्या धामी सरकारने विधानसभेत समान नागरी संहिता विधेयक सादर केले. समान नागरी संहिता (Uniform Civil Code Uttarakhand 2024) जात आणि धर्माचा विचार न करता राज्यातील सर्व समुदायांसाठी समान नागरी कायदे प्रस्तावित करते. मंजूर झाल्यास, हे राज्याच्या नागरिकांसाठी एकसमान लग्न, घटस्फोट, जमीन, मालमत्ता आणि वारसा कायद्यांसाठी कायदेशीर चौकट प्रदान करेल.

Uniform Civil Code Uttarakhand 2024 : बदलणार अनेक नियम

  • समान नागरी संहिता (यूसीसी) लागू झाल्यानंतर बहुपत्नीत्वावर बंदी घातली जाईल.
  • मुलींच्या लग्नाचे कायदेशीर वय २१ वर्षे निश्चित केले जाऊ शकते.
  • लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये असलेल्यांसाठी पोलिस नोंदणी अनिवार्य असेल.
  • लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्यांना त्यांची माहिती देणे बंधनकारक असेल आणि अशा रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्यांनी त्यांच्या पालकांना माहिती द्यावी लागेल.
  • जर विवाह नोंदणीकृत नसेल तर तुम्ही कोणत्याही सरकारी सुविधेपासून वंचित राहू शकता.
  • मुस्लिम महिलांनाही दत्तक घेण्याचा अधिकार असेल आणि दत्तक घेण्याची प्रक्रिया सोपी असेल.
  • पती-पत्नी दोघांना घटस्फोट प्रक्रियेत समान प्रक्रिया असेल.
  • नोकरी करणाऱ्या मुलाचा मृत्यू झाल्यास वृद्ध आई-वडिलांच्या देखभालीची जबाबदारी पत्नीवर असेल आणि तिला नुकसान भरपाई मिळेल.
  • पतीचा मृत्यू झाल्यानंतर पत्नीने पुनर्विवाह केल्यास, मिळालेली भरपाई त्याच्या पालकांना वाटून दिली जाईल.
  • अनाथ मुलांसाठी पालकत्वाची प्रक्रिया सुलभ केली जाईल.
  • पती-पत्नीमध्ये वाद झाल्यास मुलांचा ताबा त्यांच्या आजी-आजोबांना दिला जाऊ शकतो.

हेही वाचा : 

Back to top button