Finn Allen Record : फिन ॲलन पाकिस्तानला ‘धुतले’, षटकारांचा पाडला पाऊस | पुढारी

Finn Allen Record : फिन ॲलन पाकिस्तानला 'धुतले', षटकारांचा पाडला पाऊस

पुढारी ऑनलाईन डेस्क : न्यूझीलंडचा ओपनिंग बॅट्समन फिन ॲलन याने पाकिस्तानी बॉलर्सचा धुव्वा उडवत विश्वविक्रमाची बरोबरी केली आहे. आज सकाळी (दि.17) ड्युनेडिनमध्ये पाकिस्तानविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात केवळ 62 चेंडूत 137 धावा करून ऍलनने रेकॉर्ड बुकमध्ये आपले नाव नोंदवले. फिन ॲलन न्यूझीलंडकडून T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात मोठी शतकी खेळी करणारा फलंदाज बनला आहे. या खेळीच्या जोरावर त्याने ब्रेंडन मॅक्क्युलमच्या 123 धावांना मागे टाकले, जी टी-20 मधील कोणत्याही किवी खेळाडूची यापूर्वीची सर्वोच्च धावसंख्या आहे. यासह त्याने एका डावात सर्वाधिक षटकार मारण्याच्या विश्वविक्रमाचीही बरोबरी केली. (Finn Allen Record)

अफगाणिस्तानचा हजरतुल्ला झाझाई 16 षटकारांसह अव्वल आहे. ॲलनने पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यात 16 षटकार मारत या विक्रमाशी बरोबरी केली आहे. हजरतुल्ला झाझाईने फेब्रुवारी 2019 मध्ये आयर्लंडविरुद्धच्या सामन्यात 62 चेंडूत 162 धावा केल्या होत्या. या खेळीत त्याने 11 चौकार आणि 16 षटकार लगावले होते. फिन ऍलननेही तेवढ्याच चेंडूत 137 धावा केल्य. यामध्ये त्याने पाच चौकार आणि 16 षटकार लगावले. मात्र, आयर्लंड आणि पाकिस्तानच्या गोलंदाजीत बराच फरक आहे. अशा स्थितीत अॅलनची खेळी खूप खास मानली जात आहे. (Finn Allen Record)

हॅरिस रौफची मनसोक्त धुलाई

या खेळीदरम्यान फिन ऍलनने हॅरिस रौफचा वाईट पद्धतीने धुतले. फिन ॲलनने रौफच्या एका षटकात तीन षटकार आणि दोन चौकारांच्या मदतीने 27 धावा केल्या. त्याच्या खेळीमुळे न्यूझीलंडने पाकिस्तानसमोर 225 धावांचे मोठे लक्ष्य ठेवले. हा सामना 45 धावांनी जिंकून न्यूझीलंडने मालिका जिंकली. किवी संघाने पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत 3-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे.

डेव्हॉन कॉनवे सात धावांवर लवकर बाद झाल्यानंतर ॲलनने टीम सेफर्टसह दुसऱ्या विकेटसाठी 125 धावांची जबरदस्त भागीदारी केली. आक्रमक ऍलनला स्ट्राइकवर ठेवण्यासाठी सेफर्टने फक्त स्ट्राइक फिरवला. त्याने धावा काढण्यावर लक्ष केंद्रित करत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. फिन ऍलनच्या खेळीदरम्यान पंचांनी तीन वेळा चेंडू बदलला, हा त्याच्या आक्रमक फलंदाजीचा पुरावा होता. यावरून तो किती ताकदीने चेंडू मारत होता, हे समजू शकते. फिन ऍलनची शानदार खेळी 18व्या षटकात संपुष्टात आली. जमान खानच्या एका ऑफ कटर बॉलने तो बोल्ड झाला.

हेही वाचा :

Back to top button