Rishabh Pant : टीम इंडियासाठी खूषखबर! ऋषभ पंतने दिले पुनरागमनाचे संकेत

Rishabh Pant : टीम इंडियासाठी खूषखबर! ऋषभ पंतने दिले पुनरागमनाचे संकेत

पुढारी ऑनलाईन डेस्क : टीम इंडियाचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत आयपीएलमधून व्यावसायिक क्रिकेटमध्ये पुनरागमन करू शकतो. डिसेंबर २०२२ मध्ये झालेल्या कार अपघातानंतर पंत फिटनेसवर काम करत आहे. पंतने मंगळवारी (दि.17) बेंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर नेटमध्ये फलंदाजी केली. यानंतर त्याने टीम इंडियाच्या खेळाडूंचीही भेट घेतली. यावेळी पंत बराच वेळ विराट कोहलीबराेबर चर्चा करताना दिसला. (Rishabh Pant)

बंगळुरू येथे भारतीय संघ सरावासाठी येण्यापूर्वी ऋषभने राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) येथे थ्रोडाउनवर फलंदाजी केली. सरावादरम्यान त्याने ऑफ साइडवर चांगले ड्राईव्ह मारले आणि काही चेंडू ऑन साइडही खेळले. कोहलीशिवाय पंत हा डावखुरा फलंदाज रिंकू सिंगसोबतही चर्चा करत होता. याचे फोटो भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( बीसीसीआय) शेअर केले आहेत.

'एनसीए'मध्‍ये पंत घेतोय मेहनत

डिसेंबर २०२२ साली झालेल्या कार अपघातात जखमी झाल्यानंतर ऋषभ आता एनसीएमध्ये पुन्हा फिटनेस मिळवत आहे. तो इंडियन प्रीमियर लीग 2024 मध्ये पुनरागमन करण्याची शक्यता आहे कारण त्याची दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये दिल्ली कॅपिटल्सच्या सराव शिबिरातही भाग घेतला होता. डिसेंबरमध्ये दुबईत झालेल्या लिलावातही तो फ्रँचायझी संघासोबत उपस्थित होता. (Rishabh Pant)

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news