AUS vs PAK 3rd Test : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिस-या कसोटीतून शाहीन आफ्रिदी, इमाम उल हकला डच्चू | पुढारी

AUS vs PAK 3rd Test : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिस-या कसोटीतून शाहीन आफ्रिदी, इमाम उल हकला डच्चू

पुढारी ऑनलाईन डेस्क : AUS vs PAK 3rd Test : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या शेवटच्या कसोटीसाठी पाकिस्तानने आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन बदल केले आहेत. पहिल्या दोन सामन्यात पराभव झालेल्या पाकिस्तानी संघाने मालिका आधीच गमावली आहे. आता शेवटचा सामना 3 जानेवारीपासून सिडनीत खेळवला जाणार आहे.

पाकिस्तानी संघाने मालिकेतील पहिले दोन सामने वाईटरित्या गमावले. आता शेवटचा सामना 3 जानेवारीपासून सिडनी येथे खेळवला जाणार आहे. सामन्याच्या एक दिवस अगोदर पाकिस्तानने आपला संघ जाहीर करून प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन नवीन खेळाडूंना संधी दिली आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलियानेही आपली प्लेइंग इलेव्हन जाहीर केली आहे.

शाहीन आफ्रिदी-इमाम उल हक यांना डच्चू (AUS vs PAK 3rd Test)

सिडनीमध्ये खेळण्यात येणा-या कसोटीतून पाकिस्तानचा टी-20 कर्णधार शाहीन शाह आफ्रिदीला वगळण्यात आले आहे. त्याचबरोबर सलामीवीर इमाम उल हक यालाही कट्ट्यावर बसवण्यात आले आहे. मात्र, या दोन्ही खेळाडूंना कामगिरीच्या आधारावर डच्चू देण्यात आला आहे की दुखापतीचामुळे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या दोन खेळाडूंच्या जागी सईम अयुब आणि साजिद खान हे दोघे खेळताना दिसणार आहेत.

सईम अयुब सलामीला येणार? (AUS vs PAK 3rd Test)

इमाम-उल-हकच्या अनुपस्थितीत अब्दुल्ला शफीकसह सईम अयुब सलामीवीर म्हणून खेळताना दिसेल, अशी शक्यता आहे. तर साजिद खान हा शाहीन आफ्रिदीच्या जागी गोलंदाजीची जबाबदारी सांभाळणार आहे. माजी कर्णधार बाबर आझम पूर्वीप्रमाणे चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना दिसेल. त्याचवेळी सर्फराज खानला पुन्हा प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मोहम्मद रिझवानने यष्टिरक्षक फलंदाज म्हणून चांगकी कामगिरी केली आहे. अलीकडे ऑस्ट्रेलियात बीबीएल खेळणाऱ्या हरिस रौफ, जमान खान आणि उस्मान मीर यांनाही पीसीबीने प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान दिलेले नाही.

या मालिकेतील पहिला सामना कॅनबेरा येथे खेळला गेला होता, जो यजमान ऑस्ट्रेलियाने 360 धावांच्या मोठ्या फरकाने जिंकला होता. तर मालिकेतील दुसरा सामना पर्थमध्ये खेळला गेला, ज्यात ऑस्ट्रेलियाने 79 धावांनी विजय मिळवून मालिका खिशात घातली. आता तिसरा आणि शेवटचा सामना 3 जानेवारीपासून सिडनीत खेळवला जाणार आहे. (AUS vs PAK 3rd Test)

Back to top button