Sri Lanka : 'एका' नामुष्कीजनक पराभवाने श्रीलंकेचा क्रिकेट बोर्ड बरखास्त | पुढारी

Sri Lanka : 'एका' नामुष्कीजनक पराभवाने श्रीलंकेचा क्रिकेट बोर्ड बरखास्त

पुढारी ऑनलाईन डेस्क : विश्वचषक स्पर्धेत (World Cup 2023) भारताकडून झालेल्या नामुष्कीजनक पराभवानंतर श्रीलंकेचे क्रीडा मंत्री रोशन रणसिंघे यांनी सोमवारी (दि.६) राष्ट्रीय क्रिकेट बोर्डच (Sri Lanka Cricket Board) बरखास्त केला. भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे रणसिंगे आणि बोर्ड यांच्यात अनेक महिन्यांपासून मतभेद असतानाच भारताविरुद्धच्या पराभवानंतर क्रिकेट बोर्डाची हकालपट्टी केली. श्रीलंकेला  १९९६ चा विश्वचषक मिळवून देणारा कर्णधार अर्जुन रणतुंगा याची नवीन क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या : 

 

क्रीडामंत्री रणसिंगे यांच्या कार्यालयाने जारी केलेल्या एका निवेदनानुसार, रणसिंघे यांनी श्रीलंका क्रिकेटसाठी अंतरिम समिती स्थापन केली आहे. नवीन सात सदस्यीय समितीमध्ये सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश आणि बोर्डाचे माजी अध्यक्ष यांचाही समावेश आहे. बोर्डाचे दुसरे सर्वोच्च अधिकारी सचिव मोहन डी सिल्वा यांनी राजीनामा दिल्याच्या एक दिवसानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे. (Sri Lanka Cricket Board)

गेल्या आठवड्यात विश्वचषक स्पर्धेत यजमान भारताकडून श्रीलंकेचा ३०२ धावांनी पराभव झाल्यानंतर रणसिंगे यांनी जाहीरपणे संपूर्ण बोर्डाच्या राजीनाम्याची मागणी केली होती. भारताच्या ३५८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, श्रीलंकेने १४ धावांमध्ये ६ विकेट गमावल्या होत्या. अखेर केवळ ५५ धावांवरच संपूर्ण संघ गुंडाळला होता. विश्वचषकाच्या इतिहासातील श्रीलंकेची चौथी सर्वात कमी धावसंख्या आहे. या पराभवामुळे श्रीलंकेतील चाहत्यांमध्ये संताप्त प्रतिक्रिया उमटत होत्या. शनिवारी बोर्डाविरोधात निदर्शने झाली होती. त्यानंतर कोलंबोतील बोर्ड कार्यालयाबाहेर पोलिस तैनात करण्यात आले आहेत. अधिकाऱ्यांना पदावर राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही. बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी स्वेच्छेने राजीनामा द्यावा, असे रणसिंगे म्हणाले होते. त्यांनी यापूर्वी देखील मंडळावर भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. सोमवारी श्रीलंकेला बांगलादेशविरुद्ध खेळायचे आहे. त्यांना विश्वचषकाच्या अंतिम चारमध्ये स्थान मिळवायचे असेल तर हा सामना जिंकण्याची गरज आहे.

हेही वाचा : 

 

Back to top button