National Games 2023 : प्रियांकाच्या दुहेरी गोलमुळे महाराष्ट्राच्या महिला हॉकी संघाचा कर्नाटकवर शानदार विजय | पुढारी

National Games 2023 : प्रियांकाच्या दुहेरी गोलमुळे महाराष्ट्राच्या महिला हॉकी संघाचा कर्नाटकवर शानदार विजय

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : प्रियांका वानखेडेच्या दुहेरी गोलच्या बळावर महाराष्ट्राच्या महिला संघाने राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील अखेरच्या साखळी सामन्यात कर्नाटकवर ३-१ असा शानदार विजय मिळवला. पण महाराष्ट्राच्या संघाला उपांत्य फेरी गाठण्यात अपयश आले. (National Games 2023)

संबंधित बातम्या : 

या सामन्यात पहिले सत्र गोलशून्य बरोबरीत सुटले. दुसऱ्या सत्रात २७ व्या मिनिटाला प्रियांकाने महाराष्ट्राचा पहिला गोल साकारला. पण पुढच्याच मिनिटाला कर्नाटकच्या निशा पी सी हिने (२८ व्या मिनिटाला) पेनल्टी कॉर्नरद्वारे गोल करीत मध्यंतराला १-१ अशी बरोबरी साधली. (National Games 2023)

तिसऱ्या सत्रातही दोन्ही संघांना गोल नोंदवण्यात अपयश आले. चौथ्या सत्रात मात्र महाराष्ट्राने आव्हान टिकवण्यासाठी आक्रमक खेळ केला. ५३ व्या मिनिटाला प्रियांकाने पेनल्टी कॉर्नरद्वारे गोल करीत महाराष्ट्राची आघाडी २-१ अशी वाढवली. त्यानंतर दोन मिनिटांनी लालरिंडिकीने (५५ व्या मिनिटाला) मैदानी गोल करीत महाराष्ट्राच्या खात्यावर तिसरा गोल जमा केला. या सामन्यात महाराष्ट्राच्या भावना खाडेला पिवळे कार्ड दाखवण्यात आले.

ब-गटातून झारखंड (१० गुण) आणि पंजाब (७ गुण) यांनी उपांत्य फेरीत स्थान मिळवले. महाराष्ट्रानेही ७ गुण कमावले. पण गोलफरकामध्ये पंजाबने आगेकूच केली.

हेही वाचा : 

Back to top button