सचिन तेंडुलकरने केले विराटचे अभिनंदन, "पुढील काही दिवसात..." | पुढारी

सचिन तेंडुलकरने केले विराटचे अभिनंदन, "पुढील काही दिवसात..."

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : वन-डे वर्ल्डकप स्पर्धेमध्ये द. आफ्रिकाविरूद्धच्या सामन्यात विराट कोहलीने खास विक्रम आपल्या नावावर केला . त्याने भारताचा माजी दिग्गज फलंदाज सचिन तेंडूलकरच्या विक्रमाशी बरोबरी केली. त्‍याच्‍या या खेळीनंतर मास्‍टर ब्‍लास्‍टर सचिन तेंडुलकरने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर ( पूर्वीचे ट्विटर ) पोस्‍ट करत विराट काेहलीचे अभिनंदन केले आहे. ( Sachin Tendulkar congratulated Virat Kohli )

पुढील काही दिवसात तू माझा विक्रम मोडशील

सचिनने आपल्‍या पोस्‍टमध्‍ये म्‍हटले आहे की, विराट चांगला खेळलास, या वर्षाच्या सुरुवातीला ४९ वरून ५० वर जाण्यासाठी मला ३६५ दिवस लागले. मला आशा आहे की, ४९ वरून ५० शतके करत पुढील काही दिवसात तू माझा विक्रम मोडशील. ( Sachin Tendulkar congratulated Virat Kohli )

सचिनने वन-डे क्रिकेटमध्ये 463 सामन्यांमध्ये 453 इनिंग खेळत 49 शतक झळकावली आहेत. विराट कोहलीने 289 सामन्यात 277 इनिंगमध्ये 49 झळकवत सचिनच्या विक्रमाशी बरोबरी केली आहेत. विराटने वन-डेमध्ये सर्वाधिक शतके श्रीलंकाविरूद्ध झळकावली आहेत. त्याने आत्तापर्यंत श्रीलंका संघाविरूद्ध सर्वाधिक 10 शतके झळकावली आहेत. (Virat Kohli )

हेही वाचा : 

 

Back to top button