Mumbai Indians : आयपीएलच्या लिलावापूर्वी मुंबई इंडियन्सची मोठी खेळी! लखनौच्या 'या' खेळाडूला केले खरेदी | पुढारी

Mumbai Indians : आयपीएलच्या लिलावापूर्वी मुंबई इंडियन्सची मोठी खेळी! लखनौच्या 'या' खेळाडूला केले खरेदी

पुढारी ऑनलाईन डेस्क : टाटा IPL 2024 साठी सर्व संघ जोरात तयारी करत आहेत. अलीकडेच अनेक संघांनी आपल्या कोचिंग स्टाफमध्ये मोठे बदल केले आहेत. त्याच वेळी, आता ट्रेडिंग विंडो अंतर्गत खेळाडू खरेदी करण्याची प्रक्रिया देखील सुरू झाली आहे. यामध्ये मुंबई इंडियन्सने पहिली बाजी खेळत लखनौ सुपर जायंट्सच्या एका खेळाडूचा आपल्या संघात समावेश केला आहे. (Mumbai Indians 2024)

लखनौच्या ‘या’ खेळाडूची केली खरेदी

टाटा IPL 2024 च्या आधी सुरू असलेल्या टाटा इंडियन प्रीमियर लीग ट्रेडिंग विंडो दरम्यान लखनौ सुपर जायंट्स (LSG) कडून रोमॅरियो शेफर्डला मुंबई इंडियन्सने विकत घेतले आहे. रोमारियो शेफर्ड हा आतापर्यंत आयपीएलमध्ये एलएसजी आणि सनरायझर्स हैदराबाद संघाकडून खेळला आहे. मुंबई इंडियन्सने रोमारियो शेफर्डला 50 लाख रुपयांना विकत घेतले आहे. (Mumbai Indians 2024)

रोमारियो शेफर्डची आयपीएल कारकीर्द

रोमारियो शेफर्डने आयपीएलमध्ये आतापर्यंत केवळ 4 सामने खेळले आहेत. आयपीएल 2023 मध्ये तो लखनऊ सुपर जायंट्ससाठी फक्त 1 सामना खेळला होता. या सामन्यात त्याने ना फलंदाजी केली ना गोलंदाजी केली होती. तर 2022 साली झालेल्या आयपीएल हंगामात त्याने सनरायझर्स हैदराबादसाठी 3 सामने खेळले होते. यादरम्यान त्याने 10.89 च्या इकॉनॉमीने धावा देत 3 विकेट्स घेतल्या होत्या.

आयपीएल 2024 चा लिलाव होणार या तारखेला

यंदाच्या आयपीएल हंगामासाठी खेळाडूंचा लिलाव 19 डिसेंबर रोजी दुबईमध्ये होऊ शकतो. असे झाल्यास परदेशात लिलाव होण्याची ही पहिलीच वेळ असेल. आयपीएलच्या दहा संघांना रिटेन आणि रिलीज केलेल्या खेळाडूंची यादी सादर करण्यासाठी 26 नोव्हेंबरपर्यंत वेळ आहे. त्यानंतर डिसेंबरच्या सुरूवातीस लिलाव पूल तयार केला जाईल.

हेही वाचा :

Back to top button