England vs Bangladesh : इंग्लंडचे बांगलादेशला ३६५ धावांचे लक्ष्य | पुढारी

England vs Bangladesh : इंग्लंडचे बांगलादेशला ३६५ धावांचे लक्ष्य

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : वन-डे (एकदिवसीय) विश्वचषक स्‍पर्धेतील सातवा सामना आज इंग्लंड आणि बांगलादेश (  England vs Bangladesh ) यांच्यात होत आहे. बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय होता. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडच्या डेव्हिड मलानने केलेल्या शतकी (१४०) आणि जॉनी बेअरस्टो (५२), जो रूट (८२) यांनी अर्धशतकी खेळी केली. या खेळीच्या जोरावर इंग्लंडने ९ गडी गमवून ३६४ धावा केल्या. बांगलादेशकडून मेहदी हसनने सर्वाधिक ४ बळी घेतले. त्याला शोरीफुल इस्लामनने ३ बळी घेत उत्तम साथ दिली. तर शाकिब अल हसन आणि तस्किन अहमद यांनी प्रत्येकी १ बळी घेतले.

इंग्लंडला नववा धक्का, ख्रिस व्होक्स बाद

सामन्याच्या शेवटच्या ओव्हरमध्ये ख्रिस व्होक्सच्या रूपात इंग्लंडला नववा धक्का बसला. त्याला तस्किन अहमदने मेहदी हसनकरवी झेलबाद केले. त्याने आपल्या खेळीत ११ बॉलमध्ये १४ धावांची खेळी केली.

इंग्लंडला आठवा धक्का, आशिल राशिद बाद

सामन्याच्या ४९ व्या ओव्हरमध्ये इंग्लंडची आठवा विकेट पडली. बांगलादेशचा गोलंदाज मेहदी हसनने शांतोकरवी आदिल राशिदला झेलबाद केले. राशिदने आपल्या खेळीत ७ बॉलमध्ये ११ धावा केल्या.

इंग्लंडला सातवा धक्का, सॅम करण बाद

सामन्याच्या ४७ व्या ओव्हरमध्ये इंग्लंडला सातवा धक्का बसला. बांगलादेशचा गोलंदाज मेहदी हसनने शांतोकरवी सॅम करणला झेलबाद केले. करणने आपल्या खेळीत १५ बॉलमध्ये ११ धावा केल्या.

इंग्लंडला सहावा धक्का, हॅरी ब्रूक माघारी

३२७ धावांवर इंग्लंडची सहावी विकेट पडली. हॅरी ब्रूक १५ बॉलमध्ये २० धावा करून बाद झाला. महेदी हसनने त्याला लिटन दासकरवी झेलबाद केले.

रूट पाठोपाठ लिव्हिंगस्टोन तंबूत

शोरीफुल इस्लामने जो रूट आणि लियाम लिव्हिंगस्टोनला लागोपाठ बॉलवर बाद केले. रूट ६८ चेंडूत ८२ धावा करून बाद झाला. त्याने आपल्या खेळीत आठ चौकार आणि एक षटकार लगावला. शरीफुलने त्याला मुशफिकुर रहीमकडे झेलबाद केले. पुढच्याच बॉलवर त्याने लिव्हिंगस्टोनलाही बोल्ड केले. लिव्हिंगस्टोन पहिल्याच बॉलवर बाद झाला. त्याला खातेही उघडता आले नाही.

इंग्लंडला सलग तिसरा धक्का, रूटचे शतक हुकले

सामन्याच्या ४२ व्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर शोरीफुलने जो रूटला मुशफिककरवी झेलबाद करत इंग्लंडला चौथा धक्का दिला. यामुळे सामन्यात ६८ बॉलमध्ये ८२ धावांची खेळी केलेल्या रूटचे शतक हुकले. यामध्ये त्याने ८ चौकार आणि १ षटकार लगावला.

३८ व्‍या षटकामध्‍ये फिरकीपटू महेदी हसने मलान याला चकावा देत क्‍लीन बोल्‍ड केले.  मलान याने १०७ चेंडूत, १६ चौकार आणि ५ षटकार फटकावत १४० धावांची खेळी केली. यानंतर ४० व्‍या षटकात २० धावांवर फलंदाजी करणार्‍या जोस बटलरला शाेरिफुल इस्लामने क्‍लीन बाेल्‍ड केले. इंग्‍लंडने ४० षटकांमध्‍ये ३ गडी गमावत २९८ धावा केल्‍या आहेत.

नाणेफेक जिंकत बांगलादेशचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय

इंग्लंडला पहिल्या सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले होते. तर त्याचवेळी बांगलादेशने अफगाणिस्तानवर विजय मिळवला होता. इंग्लंड आजच्‍या सामन्‍यात विजय मिळवून पुनरागमनाचा प्रयत्न करण्‍यासाठी मैदानात उतरला आहे. तर सलग दुसरा सामना जिंकण्‍यासाठी बांगलादेशचा प्रयत्‍न असणार आहे.नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंग्लंड संघाने दमदार सुरुवात केली आहे. जॉनी बेअरस्टो आणि  डेव्हिड मलान यांनी वेगवान धावा करत आपल्या संघाला चांगली सुरुवात करून दिली.

मलान-रुटची दमदार फलंदाजी

१२ चौकार आणि दोन षटकारांची फटकेबाजी करत डेव्‍हिड मलाने ९१ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. यानंतर जो रूटने मलानला भक्‍कम साथ देत धावफलक हालता ठेवला. जो रुटने ४ चौकार आणि एका षटकार फटकावत ४४ चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केले.३८ व्‍या षटकामध्‍ये फिरकीपटू महेदी हसने मलान याला चकावा देत क्‍लीन बोल्‍ड केले. मलान याने १०७ चेंडूत, १६ चौकार आणि ५ षटकार फटकावत १४० धावांची खेळी केली.

इंग्लंड संघ : जॉनी बेअरस्टो, डेविड मलान, जो रूट, हॅरी ब्रूक, जोस बटलर (विकेटकीपर), लियाम लिव्हिंगस्टोन, सॅम करन, ख्रिस वोक्स, आदिल रशीद, मार्क वुड, रीस टोपली.

बांगलादेश संघ : तनजीद हसन, लिटन दास, नझमुल हसन शांतो, शकीब अल हसन (कर्णधार), मेहदी हसन मिराज, मुशफिकुर रहीम (विकेटकीपर), तौहीद ह्रदोय, महेदी हसन, तस्किन अहमद, शाेरिफुल इस्लाम, मुस्तफिजुर रहमान.

Back to top button