Asian Games Women’s Hockey Semifinal | स्‍वप्‍नभंग…महिला हाॅकी संघ उपांत्य फेरीत पराभूत | पुढारी

Asian Games Women's Hockey Semifinal | स्‍वप्‍नभंग...महिला हाॅकी संघ उपांत्य फेरीत पराभूत

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : आशियाई क्रीडा स्‍पर्धेत आज (दि.५) हॉकीमध्‍ये महिला संघाच्‍या पदरी निराशा आली. उपांत्‍य फेरीच्‍या सामन्‍यात  चीनने भारताचा 0-४ असा पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली. या पराभवामुळे आशियाई क्रीडा स्‍पर्धेत आणखी एक सुवर्ण पदक जिंकण्‍याचे भारताचे स्‍वप्‍न भंगले आहे. (Asian Games Women’s Hockey Semifinal) आता कांस्‍यपदासाठी महिला हाॅकी संघाचा सामना शनिवार,७ ऑक्‍टाेबर राेजी हाेणार आहे.

संबंधित बातम्या 

सुरुवातीपासून भारताचा बचावात्‍मक खेळ

भारताने चीन विरुद्‍ध उपांत्य फेरीच्‍या सामन्‍यात भारतीय हॉकीपटूने बचावात्‍मक सुरुवात केली.  पहिल्या क्वार्टरमध्ये चीनने आक्रमक खेळी केली. तीन पेनल्टी कॉर्नर मिळवले. मात्र याचे गोलमध्‍ये रुपांतर करण्‍यात आले नाही. दुसर्‍या क्वार्टरच्‍या पहिल्‍याच मिनिटाला चीनने पहिल्‍या मिनिटाला पेनल्‍टी कॉर्नर मिळवला. मात्र भारताने उत्‍कृष्‍ट बचाव केला. ( Asian Games Women’s Hockey Semifinal )

झोंग जियाकीने चीनला मिळवून दिली आघाडी

दुसर्‍या क्वार्टरमध्‍येही भारतीय हॉकीपटूंनी बचावात्‍मक खेळी केली. त्‍याचा फायदा घेत दुसर्‍या क्वार्टरच्‍या दहाव्‍या मिनिटाला झोंग जियाकीने पेनल्‍टी कॉर्नरवर गोल करत चीनला आघाडी मिळवून दिली. (Asian Games Women’s Hockey Semifinal) तिसऱ्या क्वार्टरमध्‍ये चीनने पेनल्टी कॉर्नर मिळवत दुसरा गोल केला. तिसर्‍या क्वार्टरच्‍य अखेरच्‍या मिनिटात भारताने आक्रमक खेळ केला. दाेन पेनल्‍टी कॉर्नर मिळाले. मात्र याचे गाेलमध्‍ये रुपांतर करण्‍यात टीम इंडियाला यश आले नाही.  अखेरच्‍या  यामुळे तिसऱ्या क्वार्टर संपला तेव्हा भारत ०-२ असा पिछाडीवर रहिला.

अखेरच्‍या  चाैथ्‍या क्वार्टरमध्‍येही चीनचे वर्चस्‍व कायम राहिले. चीनच्‍या बचाव फळीमुळे भारतीय संघ मिळालेल्‍या संधीचे गाेलमध्‍ये रुपांतर करु शकला नाही.  शेवटच्‍या चार मिनिटांत चीनने दाेन गाेल करत निर्णायक आघाडी घेत सामना आपल्‍या नावावर केला.

हेही वाचा :

 

 

 

Back to top button