परभणी : पूर्णा स्थानकातील रेल्वेच्या डब्यात आढळला महिलेचा मृतदेह | पुढारी

परभणी : पूर्णा स्थानकातील रेल्वेच्या डब्यात आढळला महिलेचा मृतदेह

पूर्णा,पुढारी वृत्तसेवा : येथील रेल्वे स्थानकातील पिटलाईन येथे हैद्राबाद-पूर्णा या सवारी गाडीच्या डब्यात बुधवारी पहाटे दोनच्या सुमारास ६५ वर्षीय महिलेचा मृतदेह आढळून आला. रेल्वे स्थानकातील पिटलाईन येथे रेल्वे गाड्यांची स्वच्छता केली जाते. दरम्यान या गाडीची स्वच्छता करत असताना हा मृतदेह आढळून आला. सिताबाई चन्नय्या लक्ष्मीगारे (वय ७५) असे या मृत महिलेचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, पूर्णा रेल्वे स्थानकावरील पिटलाईन येथे पूर्णा-हैद्राबाद ही सवारी गाडी साफसफाई करण्याच्या हेतूने उभी करण्यात आली होती. या गाडीची साफसफाई करत असताना रेल्वे कर्मचाऱ्यांना ही महिला मृत अवस्थेत आढळून आली. तत्काळ त्यांनी पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असता घटनास्थळी तिने रक्ताच्या उलट्या केल्याचे पोलिसांना दिसून आले. या महिलेची ओळख पटली असून ती तेलंगाणा येथील रहिवाशी आहे. या महिलेचा मृतदेह उत्तरीय तपासणी करुन परभणी येथील सरकारी रुग्णालयात ठेवण्यात आला आहे. या महिलेच्या मुलाला याची माहिती देण्यात आली असून तो मृतदेह घेऊन जाण्यासाठी येत असल्याची माहिती पूर्णा रेल्वे दुरक्षेत्र लोहमार्ग पोलीस ठाण्याचे पोलिस नायक भिमराव छापेवार यांनी दिली.

हेही वाचा :

Back to top button