Sourav Ganguly on WTC : सौरव गांगुलींचे अजब विधान; म्‍हणे “WTC जिंकण्‍यापेक्षा …” | पुढारी

Sourav Ganguly on WTC : सौरव गांगुलींचे अजब विधान; म्‍हणे "WTC जिंकण्‍यापेक्षा ..."

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामन्‍यात ऑस्‍ट्रेलियाकडून तब्‍बल २०९ धावांनी पराभव पत्‍कारावा लागला. या पराभवानंतर संघातील दिग्‍गज क्रिकेटपटूंवर माजी क्रिकेटपटूंनी टीकेचे आसूड ओढले . तसेच कर्णधार रोहित शर्माने अंतिम सामन्‍यापूर्वी घेतलेल्‍या काही निणर्यांवरही सवालही केले. मात्र  आता टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुली यांनी रोहित शर्माची पाठराखण केली आहे. मात्र राेहितची पाठराखण करताना त्‍यांनी केलेले विधान वादग्रस्‍त ठरले आहे. यामुळे त्‍याला सोशल मीडियावर ट्रोलला सामोरे जावे लागत आहे. ( Sourav Ganguly on WTC )

सौरव गांगुली भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे ( बीसीसीआय) अध्यक्ष असताना रोहित शर्मा याची क्रिकेटमधील सर्व फॉरमॅटमध्ये कर्णधार म्हणून नियुक्त झाली होती. आता वारंवार अपयशाला सामोरे जावे लागलेल्‍या रोहितच्‍या बचावासाठी गांगुली सरसावले आहेत.

Sourav Ganguly on WTC : सौरव गांगुलीचे अजब विधान…

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामन्‍यात पराभवाबाबत बोलताना गांगुली म्‍हणाले, “माझा रोहितवर पूर्ण विश्‍वास आहे. रोहित शर्मा आणि महेंद्रसिंग धोनी या दोघांनी आयपीएलची ५ विजेतेपदे जिंकली आहेत. आयपीएल जिंकणे सोपे नाही. ही एक कठीण स्‍पर्धा आहे. विश्वचषक जिंकण्यापेक्षा आयपीएल जिंकणे कठीण आहे. कारण आयपीएलमध्ये १४ सामने जिंकल्यानंतर संघ प्ले-ऑफमध्ये धडक मारतो. विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत प्रवेश करण्यासाठी केवळ चार ते पाच सामने खेळावे लागतात. आयपीएलमध्ये चॅम्पियन होण्यासाठी तुम्हाला १७ सामने खेळावे लागतात, असे अजब तर्क मांडत गांगुली यांनी रोहितची पाठराखाण केली.

भारताला एका कर्णधाराची गरज होती

विराट कोहलीने टीम इंडियाने कर्णधार पद सोडल्‍यानंतर निवडकर्त्यांना एका कर्णधाराची गरज होती. त्यावेळी रोहित शर्मा हाच कर्णधारपदासाठी सर्वोत्तम होता. त्याने पाच आयपीएल ट्रॉफी जिंकल्या होत्या आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही चांगली कामगिरी केली होती. निवडकर्त्यांनी नोकरीसाठी सर्वोत्तम असलेल्या व्यक्तीची निवड केली, असे सांगत कर्णधारपदासाठी रोहित शर्माच कसा योग्‍य होता, असेही गांगुली यांनी सांगितले.

हेही वाचा :

 

 

Back to top button