MI vs CSK : चेन्नईने मुंबईला १५७ धावांत रोखले | पुढारी

MI vs CSK : चेन्नईने मुंबईला १५७ धावांत रोखले

पुढारी ऑनलाईन डेस्क : गोलंदाजांच्या शानदार कामगिरीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्जने मुंबई इंडियन्सला २० षटकांत ८ बाद १५७ धावांवर रोखले. त्यांना विजयासाठी १५८ धावा करायच्या आहेत. मुंबईसाठी इशान किशनने २१ चेंडूत सर्वाधिक ३२ धावा केल्या. टीम डेव्हिडने २२ चेंडूत ३१ धावांचे योगदान दिले. टिळक वर्माने २२, कर्णधार रोहित शर्माने २१, हृतिक शोकीनने नाबाद १८ आणि कॅमेरून ग्रीनने १२ धावा केल्या. ट्रिस्टन स्टब्स पाच, अर्शद खान दोन आणि सूर्यकुमार यादवने एक धावा काढून बाद केले. पियुष चावलाने नाबाद पाच धावा केल्या.

चेन्नईकडून रवींद्र जडेजाने सर्वाधिक विकेट घेतल्या. त्याने चार षटकात २० धावा देऊन तीन बळी घेतले. मिचेल सँटनर आणि तुषार देशपांडे यांना प्रत्येकी दोन यश मिळाले. सिसांडा मगालाने एक विकेट घेतली.

संघ : 

मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), कॅमेरॉन ग्रीन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, टिम डेव्हिड, ट्रिस्टन स्टब्स, अर्शद खान, हृतिक शोकीन, पियूष चावला, जेसन बेहरेनडॉर्फ.

चेन्नई सुपर किंग्ज : डेव्हॉन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, अजिंक्य रहाणे, रवींद्र जडेजा, महेंद्रसिंग धोनी (विकेटकीपर), शिवम दुबे, ड्वेन प्रिटोरियस, दीपक चहर, मिचेल सँटनर, सिसांडा मगला, तुषार देशपांडे.

हेही वाचा;

Back to top button