IND vs AUS : ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स तिसऱ्या कसोटीपूर्वीच मायदेशी परतणार; जाणून घ्या काय आहे कारण | पुढारी

IND vs AUS : ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स तिसऱ्या कसोटीपूर्वीच मायदेशी परतणार; जाणून घ्या काय आहे कारण

पुढारी ऑनलाईन डेस्क : ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स भारताविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी मायदेशी परतणार आहे.
कौटुंबिक प्रकृतीच्या समस्येमुळे काही काळासाठी कमिन्स सिडनीला जाणार आहे. उर्वरित टीम मात्र भारतातच राहील. १ मार्चपासून भारत आणि ऑस्ट्रलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना इंदोरमध्ये सुरू होणार आहे. यापूर्वी तो भारतात परतण्याची शक्यता आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेतील सुरूवातीचे दोन सामने ऑस्ट्रेलियाने गमावले आहेत. चार सामन्यांच्या या मालिकेत भारताने २-० अशी भक्कम आघाडी घेतली आहे. आता ऑस्ट्रेलियाला मालिका जिंकण्याची संधी नाही, पण उर्वरित दोन सामने जिंकून कांगारू संघ मालिका बरोबरीत आणू शकतो. शिवाय ऑस्ट्रेलियन संघाला उर्वरित दोन सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करून जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित करायचे आहे.

तिसरा कसोटी सामना इंदोरच्या होळकर क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या सामन्याआधीच पॅट कमिन्स सिडनीला जाणार आहे. कमिन्सने बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये आतापर्यंत ३९.६६ च्या सरासरीने तीन बळी घेतले आहेत.

बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या उर्वरित दोन सामन्यांसाठी दोन्ही संघ

ऑस्ट्रेलिया : पॅट कमिन्स (कॅप्टन), अॅश्टन आगर, स्कॉट बोलँड, अॅलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, पीटर हँड्सकॉम्ब, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, उस्मान ख्वाजा, मॅथ्यू कुहनमन, मार्नस लॅबुशेन, नॅथन लियॉन, लान्स मॉरिस, टॉड मर्फी, मॅथ्यू रेनशॉ, स्टीव्ह स्मिथ (व्हीसी), मिचेल स्टार्क, मिचेल स्वीपसन, डेव्हिड वॉर्नर.

भारत : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत, इशान किशन, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद शमी सिराज, उमेश यादव, सूर्यकुमार यादव, जयदेव उनाडकट.

हेही वाचा :

Back to top button