इंग्लंडमधील ‘बायो सेक्युअर’ कसोटी मालिकेसाठी वेस्ट इंडिजची संमती! | पुढारी

इंग्लंडमधील 'बायो सेक्युअर' कसोटी मालिकेसाठी वेस्ट इंडिजची संमती!

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

वेस्ट इंडिज क्रिकेट संघटनेच्या प्रमुखांनी आपला संघ इंग्लंडमध्ये होणाऱ्या बायो सेक्युअर वातावरणात कसोटी मालिकेसाठी पाठवण्यास संमती दिली आहे. वेस्ट इंडिज इंग्लंडमध्ये जून महिन्यात 3 कसोटी सामन्यांची मालिका खेळणार होता. पण, कोरोना संकटामुळे ही मालिका आता जुलैमध्ये होणार आहे. क्रिकेट वेस्ट इंडिजने, ‘क्रिकेट वेस्ट इंडिज बोर्डाने इंग्लंड दौऱ्याला तत्वतः मान्यता दिली आहे.’ असे आपल्या वक्तव्यात म्हटले आहे. हा निर्णय क्रिकेट वेस्ट इंडिजच्या वैद्यकीय टीमने इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाच्या सल्लागार समितीशी प्रदीर्घ चर्चा केल्यानंतर घेण्यात आला असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.  

‘त्यामुळे’ टी-२० वर्ल्डकपवर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने व्यक्त केली मोठी भिती!

क्रिकेट वेस्ट इंडिजने ‘ खेळाडू आणि स्टाफ यांना संपूर्ण स्पर्धा संपेपर्यंत बायो सिक्युर वातावरणात ठेवण्यात येईल. तसेट सगळे सामने हे बंद दाराआड खेळले जाणार आहे. त्यामुळे या दौऱ्याला तत्वतः मान्यता देण्यात आल्याचे सांगितले. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने हा दौरा 8 जुलै पासून सुरु करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. या दौऱ्यात 8, 16 आणि 24 जुलैला तीन कसोटी खेळवण्याचा मानस आहे. हे कसोटी सामने हॅम्पशायर आणि लान्सशायरच्या ओल्ड ट्रॅफोर्डवर खेळवण्यात येणार आहेत. या दोन्ही मैदानावरच हॉटेलची सुविधा आहे. 

दरम्यान, क्रिकेट वेस्ट इंडिजचा दौरा करणारा संघ हा प्रायव्हेट जेटने इंग्लंडला रवाना होणार आहे. याचबरोबर दौऱ्यापूर्वी त्यांची वैद्यकीय तपासणी तसेच संघ आणि स्टाफमधील प्रत्येकाची कोरोना चाचणीही करण्यात येणार आहे. 

टोळधाडीच्या ट्विटवरुन संजय मांजरेकर ट्रोल

बायो सिक्युर वातावरण म्हणजे काय? 

बायो सेक्युअर वातावरण म्हणजे कोरणत्याही प्रकारचा जैविक विषाणूंचा संसर्ग होऊ नये म्हणून विशेष काळजी घेण्यात येते. त्यामध्ये एक विशिष्ट भाग हा सुरक्षित केला जातो.  

Back to top button