CSKvsPBKS : पंजाब किंग्जचे चेन्नई समोर १८१ धावांचे आव्हान | पुढारी

CSKvsPBKS : पंजाब किंग्जचे चेन्नई समोर १८१ धावांचे आव्हान

पुढारी ऑनलाईन डेस्क : पंजाब किंग्ज वि. चेन्नई सुपर किंग्ज हा सामना मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडीयमवर खेळवला जात आहे. चेन्नईने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला. पंजाब किंग्जने चेन्नई सुपर किंग्ज समोर १८१ धावांचे आव्हान ठेवले आहे. पंजाब किंग्जकडून लियम लिविंगस्टोनने जोरदार फटकेबाजी केली. त्याने ३२ चेंडूमध्ये ६० धावा केल्या. सलामीवीर मयांक अग्रवाल स्वस्तात माघारी परतल्यानंतर शिखर धवन आणि लिविंगस्टोनने पंजाब किंग्जचा डाव सावरला. लिविंगस्टोन बाद झाल्यानंतर पंजाब किंग्जच्या धावांच्या गती संथ झाली. शेवटी राहुल चहरने १२ धावा करत पंजाब किंग्जचा स्कोर १८० पर्यंत पोहचवला.

चेन्नई सुपर किंग्जकडून क्रिस जॉर्डन आणि ड्वेन प्रिटोरियसने प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. तर ड्वेन ब्रावो, रविंद्र जडेजा आणि मुकेश चौधरी यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.

पंजाब किंग्जला आठवा धक्का

राहुल चहर८ चेंडूंमध्ये १२ धावा करत तंबूत परतला. राहुल चहर १ षटकार आणि १ षटकार लगावला आहे.

पंजाब किंग्जला सातवा धक्का

क्रिस जॉर्डनने पंजाब किंग्जला सातवा धक्का दिला आहे. ओडीयन स्मिथ ७ चेंडूंमध्ये ३ धावा करत तंबूत परतला आहे.

पंजाब किंग्जला सहावा धक्का

प्रिटोरियसने पंजाब किंग्जला सहावा धक्का दिला आहे. शारूख खान ११ चेंडूंमध्ये ६ धावा करत बाद झाला.

पंजाब किंग्जला पाचवा धक्का

प्रिटोरियसने पंजाब किंग्जला पाचवा धक्का दिला आहे. जितेश शर्मा १७ चेंडूमध्ये २६ धावांची खेळी करत तंबूत परतला. जितेश शर्माने या खेळीत ३ षटकारही लगावले.

पंजाब किंग्जला चौथा धक्का

लिवम लिविंगस्टोनने ३२ चेंडूंमध्ये ६० धावा करत अर्धशतक झळकावले. लिंविगस्टोनने ५ चौकर ४ षटकार लगावले. मुकेश चौधरीच्या एका षटकात त्याने २६ धावा ठोकल्या. रविंद्र जडेजाने पंजाब किंग्जला चौथा धक्का दिला आहे.

पंजाब किंग्जला तिसरा धक्का

ड्वेन ब्राव्होने पंजाब किंग्जला तिसरा धक्का दिला आहे. शिखर धवन २४ चेंडूंमध्ये ३३ धावा करत तंबूत परतला.

लिवम लिविंगस्टोनचे दमदार अर्धशतक

लिवम लिविंगस्टोनने ३२ चेंडूंमध्ये ६० धावा करत अर्धशतक झळकावले. लिंविगस्टोनने ५ चौकर ४ षटकार लगावले. मुकेश चौधरीच्या एका षटकात त्याने २६ धावा ठोकल्या.

पंजाब किंग्जला दुसरा धक्का

भानुका राजपक्षे ५ चेंडूंमध्ये ९ धावा करत धावबाद झाला आहे. महेंद्रसिंग धोनीने त्याला धावबाद केले.

पंजाब किंग्जला पहिला धक्का

मुकेश चौधरीने पंजाब किंग्जला पहिला धक्का दिला आहे. मयांक अग्रवाल २ चेंडूंमध्ये ४ धावा करत तंबूत परतला.

आयपीएलमध्ये आज चेन्नई सुपर किंग्ज वि. पंजाब किंग्ज असा सामना रंगणार आहे. मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडीयमवर हा सामना खेळवला जाईल. चेन्नईने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. चेन्नईच्या संघात तुषार देशपांडेच्या जागी क्रिस जॉरडनला संधी मिळाली आहे. तर  पंजाब किंग्जकडून आज वैभव अरोरा आणि जितेश शर्मा यांना संधी   मिळाली आहे. (CSKvsPBKS)

हेही वाचलतं का?

Back to top button