’पुनीत बालन ग्रुप’ने साकारले संविधान उद्यान | पुढारी

’पुनीत बालन ग्रुप’ने साकारले संविधान उद्यान

पुणे : पुढारी वृत्तसेवा : भारतीय संविधानाने आपल्याला मूलभूत अधिकार आणि कर्तव्ये दिली आहेत. देशाला 2047 पर्यंत विकसित राष्ट्र करायचे आहे. त्यासाठी प्रत्येक नागरिकाने संविधानात दिलेली कर्तव्ये पार पाडली, तर ते महत्त्वाचे पाऊल ठरेल, असे प्रतिपादन जनरल ऑफिसर, कमांडिंग इन चीफ दक्षिण कमांड लेफ्टनंट जनरल अजय कुमार सिंग यांनी केले.

भारतीय लष्कर आणि ’पुनीत बालन ग्रुप’च्या माध्यमातून लष्कर परिसरात विकसित करण्यात आलेल्या भारतातील पहिल्या संविधान उद्यानाचे उद्घाटन लेफ्टनंट जनरल अजय कुमार सिंग यांच्या हस्ते झाले. या वेळी ’पुनीत बालन ग्रुप’चे अध्यक्ष आणि युवा उद्योजक पुनीत बालन, माणिकचंद ऑक्सिरीच व ’माणिकचंद ग्रुप’च्या अध्यक्षा जान्हवी धारिवाल-बालन आणि दक्षिण महाराष्ट्र व गोवा उपविभागाचे जनरल ऑफिसर कमांडिंग मेजर जनरल विक्रम नाईक हे उपस्थित होते.

सिंग म्हणाले, धानाची कल्पना ज्यांनी मांडली आणि ते तयार केले, हे अत्यंत महत्त्वाचे काम होते. आपले संविधान हे जगातील सर्वात मोठे संविधान आहे. संविधानात आपल्याला मूलभूत असे अधिकार दिले असून, त्यात आपल्या कर्तव्यांचा समावेश आहे. प्रत्येक नागरिकाने आपले मूलभूत अधिकार समजून घेतले पाहिजेत आणि त्याचबरोबर आपली कर्तव्येही पार पाडली पाहिजेत. पुणेकरांसाठी हे संविधान उद्यान विशेष अशी भेट आहे. या माध्यमातून नागरिकांना आपल्या जबाबदार्‍या समजतील. तसेच, संविधान उद्यानासारखे उपक्रम राबविण्याची आवश्यकता आहे.

आपला देश ज्या संविधानावर चालतो, त्याचे भारतातील पहिले संविधान उद्यान भारतीय लष्करासमवेत तयार करताना हातभार लागला, याचा मनापासून आनंद होतो. या संविधानातील मूलभूत अधिकार आणि आपली कर्तव्ये पार पाडण्यासाठी ‘पुनीत बालन ग्रुप’ नेहमीच अग्रेसर राहील, अशी ग्वाही यानिमित्ताने मी देतो.

– पुनीत बालन, अध्यक्ष, पुनीत बालन ग्रुप.

हेही वाचा

Back to top button