हा देश जितका हिंदूंचा तितकाच अल्पसंख्याकांचासुद्धा : अनिस सुंडके | पुढारी

हा देश जितका हिंदूंचा तितकाच अल्पसंख्याकांचासुद्धा : अनिस सुंडके

पुणे : पुढारी वृत्तसेवा : सर्वधर्मसमभाव असणारा आपला भारत देश कधीही धार्मिक किंवा जातीय राजकारणाचा भाग झाला नाही. पण, आता देशात हिंदू-मुसलमान असा भेदभाव केला जातो, जो चुकीचा आहे. हा देश जितका हिंदूंचा आहे, तितकाच अल्पसंख्याकांचासुद्धा आहे, असे प्रतिपादन एमआयएमचे पुणे लोकसभेचे उमेदवार अनिस सुंडके यांनी केले आहे. सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुण्यात प्रचार सभा झाल्यानंतर त्यांच्या वक्तव्याला विरोध करून अनिस सुंडके यांनी प्रत्युत्तर दिले आहे. एमआयएमचे उमेदवार अनिस सुंडके म्हणाले की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी (दि. 29) पुण्यात आले होते.

त्यांनी मुस्लिम ओबीसी आरक्षणाबाबत वक्तव्य केले की, ओबीसी आरक्षणावर मुस्लिमांनी डाका घातलेला आहे आणि हे सर्व कर्नाटकात काँग्रेसच्या सरकारने केले असल्याचं त्यांनी म्हटले आहे. पण, मी हे सांगू इच्छितो की, हा हिंदुस्थान जितका हिंदूंचा आहे, तितकाच मुसलमानांचासुद्धा आहे, हे पंतप्रधानपदी विराजमान असलेल्या मोदींनी लक्षात घेतले पाहिजे. सत्तेत जितका हिंदूंचा अधिकार आहे, तितकाच मुसलमानांचासुद्धा अधिकार आहे. त्यामुळे यानिमित्ताने मी माझ्या मुसलमान बांधवांना सांगू इच्छितो की, पंतप्रधानांना कोणतेही काम राहिलेले दिसत नाही. त्यांना कोणतेही विकासाचे कामे सांगू वाटत नाही. फक्त हिंदू आणि मुसलमान, या दोन धर्मांच्या लोकांमध्ये भांडणे लावण्यात हे धन्यता मानतात. त्यामुळे यानिमित्त मी सांगू इच्छितो की, या देशावर जितका हिंदूंचा हक्क आहे, तितकाच मुसलमानांचासुद्धा हक्क आहे.

हेही वाचा

Back to top button