लिओचा 23 वर्षांनी लहान गर्लफे्ंरडशी रोमान्स | पुढारी

लिओचा 23 वर्षांनी लहान गर्लफे्ंरडशी रोमान्स

पुढारी ऑनलाईन

हॉलीवूड अभिनेता लिओनार्डो डीकॅप्रियोचे त्याच्या गर्लफ्रेंडसोबतचे रोमँटिक फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. नुकतेच लिओचा ‘डोन्ट लूकअप’ हा उपहासात्मक कॉमेडी असलेला चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे. यात त्याच्यासोबत जेनिफर लॉरेन्स, मेरिल स्ट्रीप, केट ब्लँचेट, जोनाह हिल अशी तगडी स्टारकास्ट आहे. या चित्रपटाचे कौतुक होत आहे. या चित्रपटाला लाभलेल्या यशाचे सेलिबे्रशन सध्या लिओ करत असून त्याला साथ देतीय त्याची गर्लफ्रेंड कॅमिला मोरोनी.

या कपलच्या व्हेकेशनचे काही फोटो सध्या व्हायरल झाले आहेत. यात दोघेही समुद्रात मस्ती करताना दिसत आहेत. त्यातून त्यांचे बाँडिंगही दिसून येत आहे. हे दोघे रिलेशनशिपमध्ये असले, तरी दोघांनीही अधिकृतरीत्या तसे सांगितलेले नाही. लिओ आणि कॅमिला 2017 पासून एकमेकांना डेट करत आहेत. 2020 च्या ऑस्कर पुरस्कारावेळीही त्यांना एकत्र पाहिले गेले होते. कॅमिला आणि लिओच्या वयात 23 वर्षांचे अंतर आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by @celebscandids_

Back to top button