Mahaparinirvaan Jay Bhim Song: ‘जय भीम’ हे स्फूर्तीदायक गाणं तुम्ही ऐकलं का? | पुढारी

Mahaparinirvaan Jay Bhim Song: 'जय भीम' हे स्फूर्तीदायक गाणं तुम्ही ऐकलं का?

पुढारी ऑनलाईन डेस्क : कल्याणी पिक्चर्स प्रस्तुत, अभिता फिल्म्स निर्मित ‘महापरिनिर्वाण’ ६ डिसेंबर रोजी महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. आपले अवघे आयुष्य शोषित आणि वंचितांसाठी वेचणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या निधनाच्या बातमीने महाराष्ट्र हळहळला. त्यांच्या अंत्ययात्रेला असंख्य अनुयायी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आले होते. हा मन हेलावणारा क्षण टिपणारे नामदेवराव व्हटकर यांची जीवनगाथा या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. (Mahaparinirvaan Jay Bhim Song)

प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत असतानाच या चित्रपटाच्या निर्माता टीमने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना देण्यासाठी ‘जय भीम’ हे चैतन्यमयी गाणे प्रदर्शित केले आहे. आशिष ढोले यांची संकल्पना आणि अमोल कदम यांनी शब्दबद्ध केलेल्या या गाण्याला रोहन -रोहन यांचे संगीत लाभले आहे. हे जबरदस्त गाण्याला नंदेश उमप यांचा भारदस्त आवाज लाभला आहे.

उत्साहाने आणि उल्हासाने भरलेल्या या गाण्यात एक अभिमान आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कर्तृत्व या गाण्यातून अधोरेखित होत असून अतिशय जोशपूर्ण आहे.

चित्रपटाबद्दल निर्माते सुनील शेळके म्हणतात, ”डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची विचारसरणी केवळ देशापुरताच मर्यदित नसून संपूर्ण जगासाठी प्रेरणादायी आहे. त्यांचे हे महान विचार, कर्तृत्व आम्ही या गाण्याच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे आणि याचे सारे श्रेय अमोल कदम यांना जातेय. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संपूर्ण व्यक्तिमत्व या गाण्यात मांडले आहे. त्याला रोहन-रोहन आणि नंदेश उमप यांनी उत्तम न्याय दिला आहे. मनाला उभारी देणारे हे गाणे संगीतप्रेमींना नक्कीच आवडेल.”

Back to top button