Devara : ज्यु.एनटीआरची नवी झलक पाहण्यासाठी नव्या वर्षाची करावी लागणार प्रतीक्षा? | पुढारी

Devara : ज्यु.एनटीआरची नवी झलक पाहण्यासाठी नव्या वर्षाची करावी लागणार प्रतीक्षा?

पुढारी ऑनलाईन डेस्क : देवरा १ चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज झाला असून ५ एप्रिल, २०२४ रोजी चित्रपट रिलीज होणार आहे. (Devara) देवरा चित्रपटाची खूप आधीपासून चर्चा होत आहे. तेलुगू सुपरस्टार ज्युनियर एनटीआर दिग्दर्शक कोरतला शिवासोबत एकत्र ‘देवरा: भाग १’ मध्ये एकत्र काम करणार आहेत. (Devara)

संबंधित बातम्या –

हा चित्रपट भारतीय चित्रपट उद्योगातील एक उल्लेखनीय छाप पाडेल, असे म्हटले जात आहे. या चित्रपटात बॉलीवूड अभिनेत्री जान्हवी कपूर दिसेल. ती या चित्रपटातून तेलुगू चित्रपटात पदार्पण करत आहे. या दोन्ही गोष्टींमुळे चित्रपट उद्योगात चर्चा होताना दिसत आहे.
असेही म्हटले जात आहे की, ८ जानेवारी रोजी देवरा चित्रपटाची पहिली झलक पाहायला मिळू शकते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor)

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान विरोधी भूमिकेत असेल. सोबत प्रकाश राज, शाइन टॉम चाको, श्रीकांत आणि मुरली शर्मा यांसारख्या प्रसिद्ध अभिनेत्यांचा समावेश आहे. ‘देवरा’ ची निर्मिती हा एनटीआर आर्ट्स आणि युवासुधा आर्ट्सचा संयुक्त चित्रपट आहे.

रिपोर्टनुसार, देवराच्या निर्मात्यांनी चित्रपट किती मोठा आहे हे दर्शविणारी एक झलक व्हिडिओ रिलीज करण्याची योजना आखल्याचे समजते. हा व्हिडिओ त्यांना नवीन वर्ष २०२४ पर्यंत रिलीज करायचे होते, परंतु स्पेशल इफेक्ट्स/VFX मध्ये विलंब झाल्यामुळे, त्यांनी संक्रांत सणाच्या औचित्याने तारीख बदलण्याचा निर्णय घेतला. सालारनंतर देवरा नवा ॲक्शन बेंचमार्क ठरेल.

 

View this post on Instagram

 

A post shared by Jr NTR (@jrntr)

Back to top button