संतापजनक ! लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीसोबत ‘त्याने’ केलं अस काही | पुढारी

संतापजनक ! लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीसोबत 'त्याने' केलं अस काही

पुणे : पुढारी वृत्तसेवा : चौदा वर्षांच्या अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिचे अपहरण करून अत्याचार करणार्‍याला भारती विद्यापीठ पोलिसांनी बेड्या ठोकल्या. भारती विद्यापीठ पोलिसांनी अपहरण झालेल्या मुलीला ताब्यात घेतले असून, याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली आहे. वैभव शिवराम मेरगो (वय 32, रा. कांचनवाडी, छत्रपती संभाजीनगर), प्रशांत पांडुरंग बनसोडे (वय 40, रा. टेंभुर्णी, ता. माढा, सोलापूर) आणि सुमीत वाल्मीकी (वय 25, रा. सोलापूर) यांच्यावर बलात्कारासह पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करुन वैभव मोरगो व प्रशांत बनसोडे यांना अटक केली आहे.

सुमीत वाल्मीकी हा फरार असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत. याबाबत पीडित मुलीच्या 32 वर्षीय आईने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैभव मोरगो याची चॉकलेट एजन्सी आहे, तर प्रशांत बनसोडे याचा ट्रान्स्पोर्टचा व्यवसाय आहे. वैभव मेरगो याने 14 वर्षाच्या मुलीला लग्नाचे आमिष दाखवून सुमीत आणि प्रशांत यांच्या मदतीने 18 सप्टेंबर 2022 रोजी अपहरण केले. ती अल्पवयीन असल्याचे माहिती असताना देखील आरोपीने तिच्यावर टेंभुर्णी येथे लैंगिक अत्याचार केले. तसेच छत्रपती संभाजीनगर येथे प्रशांत बनसोडे याच्या घरी देखील तिच्यावर अत्याचार केले. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सोनाली मिठारे करीत आहेत.

व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी

आरोपीने शारीरिक संबंध ठेवतानाचा व्हिडीओ बनवून व्हायरल करण्याची धमकी दिली. तसेच आई व भावाचे अपरहण करून त्यांना मारून टाकण्याची धमकी दिली. पोलिसांनी अपहरण झालेल्या मुलीचा शोध घेऊन तिची सुटका करून दोघांना अटक केली आहे.

हेही वाचा

Back to top button