Salaar Box Office Collection : सालार ५०० कोटींच्या क्लबमध्ये लवकरचं, बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई | पुढारी

Salaar Box Office Collection : सालार ५०० कोटींच्या क्लबमध्ये लवकरचं, बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई

पुढारी ऑनलाईन डेस्क : सालारने रिलीज डेलाच बॉक्स ऑफिसवर ९०.७ कोटींची धुवाँधार ओपनिंग घेतली. आम्ही तुम्हाला सालारच्या पाचव्या दिवशीचे कलेक्शन सांगत आहोत. प्रशांत नील दिग्दर्शित चित्रपट सालार शुक्रवारी चित्रपटगृहात रिलीज झाला. तेलुगु, कन्नड, तमिळ, मल्याळम आणि हिंदी भाषेत हा चित्रपट रिलीज झाला. (Salaar Day 5 Box Office Collection) यामध्ये प्रभास, श्रुती हासन आणि पृथ्वीराज सुकुमारन मुख्य भूमिकेत आहेत. सालारने रिलीज डेला बॉक्स ऑफिसवर ९०.७ कोटींची तुफान ओपनिंग केले. दुसऱ्या दिवशी कमाईत घसरण पाहायला मिळाली. त्यावेळी ५६.३५ कोटी कमावले. तिसऱ्या दिवशीच्या कलेक्शनचा आलेख पुन्हा वर गेला. (Salaar Day 5 Box Office Collection) त्यावेळी त्यांनी ६२.०५ कोटी रुपये कमावले. चौथ्या दिवशी ४२.५० कोटी रुपयांचे बिझनेस केले आहे.

संबंधित बातम्या –

सालार पाचव्या दिवशी तुफान कमाईवर

सुरुवातीच्या आकड्यानुसार, सालारचा पाचव्या दिवशीचा आकडा ४५ ते ५० कोटींची कमाई केली. चार दिवसात सालार केवळ भारतात २५० कोटींचा बिझनेस केला. वर्ल्डवाईड हा आकडा ४५० कोटींवर गेला आहे. आता लवकरच सालार ५०० कोटींच्या क्लबमध्ये पोहोचला आहे.

Back to top button