Shehnaaz Gill : शहनाज गिल रुग्णालयात दाखल; लाईव्ह येत म्हणाली, ‘आता मी…’ | पुढारी

Shehnaaz Gill : शहनाज गिल रुग्णालयात दाखल; लाईव्ह येत म्हणाली, 'आता मी...'

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेता सलमान खानसोबतच्या ‘किसी का भाई किसी की जान’ चित्रपटातून पदार्पण करणारी अभिनेत्री शहनाज गिलच्या ( Shehnaaz Gill ) प्रकृतीबद्दल मोठी अपडेटस् समोर आली आहे. शहनाजला पोटाचा संसर्ग झाल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. याबद्दलची माहिती शहनाजने स्वत: सोशल मीडियावर (एक्स टविटर) लाईव्ह येत दिली आहे.

संबधित बातम्या 

या व्हिडिओमध्ये शहनाज ( Shehnaaz Gill ) दवाखान्यातील एका बेडवर असून तेथूनच ती चाहत्यांशी संवाद साधत आहे. यावेळी तिने ‘वेळ प्रत्येकाची येत असते, माझी देखील आली आहे. पुन्हा काही दिवसांनी मी पुन्हा नव्याने समोर येणार आहे. आता माझी प्रकृती स्थिर असल्याने काळजी करण्याचे कारण नाही. बाहेरचे सँडविच खाल्ल्याने मला इंफेक्शन झालं होतं. यामुळे पोटात संसर्ग झाल्याने मला ॲडमिट केलं गेलं. मला माहित होतं की, लाईव्ह आले तर सहानुभूती मिळेल, परंतु मला हे नको आहे. असे तिने म्हटलं आहे. याशिवाय तिने बाहेरचे पदार्थ खाऊ नका असा सल्लाही चाहत्यांना दिला आहे. ही पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली आहे.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांसह अनेक बॉलिवूड स्टार्सनी ती लवकरात- लवकर बरी व्हावी म्हणून प्रार्थना केली आहेत. दरम्यान शहनाजच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी अभिनेत्री रिया कपूर रुग्णालयात पोहोचली आहे.

हेही वाचा : 

Back to top button