Zareen Khan : जरीन खानला दिलासा; फसवणूकप्रकरणी अटक वॉरंट रद्द

Zareen Khan
Zareen Khan

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेता सलमान खानसोबत 'वीर' चित्रपटात दिसलेली अभिनेत्री जरीन खानबाबत मोठी अपडेटस् समोर आली आहे. कोलकाताच्या सियालदह कोर्टातून जरीन खानच्या ( Zareen Khan ) नावावर अटक वॉरंट जारी करण्यात आलं होतं. आता ते अटक वॉरंट कोलकाता मॅजिस्ट्रेटनी रद्द केलं आहे. दरम्यान, जरीनने जामिनासाठी अर्ज किंवा न्यायालयात हजरही झाली नव्हती. यामुळे न्यायालयाने तिच्याविरुद्ध अटक वॉरंटदेखील जारी केलं होतं. या प्रकरणाची चर्चा सोशल मीडियावर पसरली आहे.

संबधित बातम्या 

जरीन खानविरुद्ध एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीने २०१८ मध्ये कोलकाता येथे ६ कार्यक्रमांना उपस्थित न राहिल्याबद्दल गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर नरकेलडांगा पोलिसांनी सियालदह न्यायालयात तिच्यावर आरोपपत्र सादर केलं होतं. दरम्यान जरीनने स्वत: च्या जामिनासाठी अर्ज किंवा न्यायालयात हजरही झाली नव्हती. यामुळे न्यायालयाने तिच्याविरूद्ध अटक वॉरंट जारी केलं होतं. आता घटनेतील सत्य आणि योग्य तथ्ये उघड झाल्यावर कोलकता मॅजिस्ट्रेटनी त्वरीत आदेश जारी करत अटक वॉरंट रद्द केल्याचे सांगितले आहे.

काय होतं प्रकरण?

२०१८ मध्ये जरीनला कोलकाता येथील दुर्गापूजेच्या कार्यक्रमात परफॉर्म करण्यास सांगण्यात आलं होतं. यानंतर ती या कार्यक्रमाला हजेरी लावली नव्हती. त्यानंतर आयोजकांनी तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. असे सादर केलेल्या अहवालात म्हटलं होतं.

यानंतर जरीनला कोलकाता पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले होतं. आयोजकांनी तिची दिशाभूल करून कार्यक्रमासाठी आमंत्रित केल्याचा आरोप जरीनने केला होता. आणि पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री या कार्यक्रमात सहभागी होणार असल्याचेही सांगितले होतं, असेही तिने सांगितले. तसेच तिच्या टिमला एक छोटासा कार्यक्रम असल्याचेही उघड झाल्याने कार्यक्रमाला हजेरी लावली नसल्याने तिने सांगितले. याशिवाय जरीनने तिच्या राहण्याच्या आणि विमान तिकिटांबाबत आयोजकांमध्ये गैरसमज असल्याचा खुलासा केला होता. यानंतर सर्व मुद्दे पाहून कोलकता मॅजिस्ट्रेटनी तिच्यावरील अटक वॉरंट रद्द केलं आहे.

वक्रफंन्टबद्दल बोलायचे झाल्यास, जरीनने सलमान खानच्या 'वीर' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. यानंतर तिने 'हाऊसफुल २', 'हेट स्टोरी ३', ' १९२१' आणि 'अक्सर २' सारख्या चित्रपटांमध्ये दिसली आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news