‘सारं काही तिच्यासाठी’, ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’मध्ये नात्यांची परीक्षा!

सारं काही तिच्यासाठी
सारं काही तिच्यासाठी

पुढारी ऑनलाईन डेस्क : झी मराठीच्या मालिकांमध्ये दर आठवड्यात नवीन ट्विस्ट येत आहेत. या मालिका प्रेक्षकांच्या मनात घर करू लागल्यात. येत्या आठवड्यात काय धमाके होणार हे पाहणं प्रेक्षकांसाठी औसुक्याचं असणार आहे. 'सारं काही तिच्यासाठी', 'तुला शिकवीन चांगलाच धडा' मालिकामध्ये नात्यांच्या परीक्षेचा गुंता पाहायला मिळणार आहे.

संबधित बातम्या 

'सारं काही तिच्यासाठी' या मालिकेत उमाने ओवी आणि कुटुंब यात ती कुठल्याही कर्तव्यात कमी पडणार नाही असं रघुनाथला सांगितले आहे आणि कुठे कमी पडलेच तर ती रघुनाथ म्हणेल ती शिक्षा भोगायला तयार असल्याचं म्हटलं आहे. रघुनाथने मात्र, उमाने दिलेलं वचन तोडल्याने पराकोटीचा दुखावलेला आहे आणि तिच्याशी त्याने अबोला धरला आहे. रघुनाथ उमाला माफ करेल का?, उमा नवी नाती जोडताना जुनी नाती सांभाळू शकेल का? हे पाहण्यासाठी चाहते आतुर झाले आहेत.

दुसरीकडे 'तुला शिकवीन चांगलाच धडा' या मालिकेत अक्षरा अधिपतीच्या लग्नानंतर भुवनेश्वरी अक्षराचं नाव बदलायचा निर्णय सांगते. भुवनेश्वरीला अक्षराचं नाव लक्ष्मी ठेवायचंय पण अक्षराला हे पटलेलं नाही. नाव बदलण्यावरुन अक्षरा आणि भुवनेश्वरीमध्ये वाद होतो. सासू सुनेच्या या द्वंद्वात काय असेल अधिपतीचा निर्णय ? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. यामुळे 'सारं काही तिच्यासाठी' आणि 'तुला शिकवीन चांगलाच धडा' मालिकेसाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news