Tiger 3 : एजंट झोया कॅटरिना कैफच्या ‘टायगर ३’ चं पोस्टर रिलीज | पुढारी

Tiger 3 : एजंट झोया कॅटरिना कैफच्या 'टायगर ३' चं पोस्टर रिलीज

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री कॅटरिना कैफचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘टायगर ३’ ( Tiger 3 ) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून ती या चित्रपटात एजंट झोयाच्या भूमिकेत झळकणार आहे. एक जबरदस्त आकर्षक भूमिका साकारली असून सगळेच या चित्रपटाची वाट आतुरतेने पाहत आहेत. कॅटरिनाने एक खास पोस्टर रिलीज केल्याने प्रेक्षकांना उत्सुकता आणखी वाढली आहे.

संबधित बातम्या 

‘एजंट झोया’ ची भूमिका कॅटरिना कशी साकारणार? हे पाहणे उत्सुकतेच ठरणार आहे. तिने पहिल्यांदा ‘एक था टायगर’ आणि ‘टायगर जिंदा है’ मध्ये भूमिका चोख बजावली होती. आता ‘टायगर ३’ ( Tiger 3 ) मध्ये कैटरिना आणि टायगरच्या मुख्य भूमिकेत बॉलिवूड अभिनेता सलमान खानसोबत झळकणार आहे. तिने ही दमदार भूमिका पुन्हा एकदा साकारली आहे.

‘फायटींग फायर विथ फायर दॅट्स झोया … #Tiger३ ट्रेलर १६ ऑक्टोबरला येत आहे. या दिवाळीत सिनेमागृहात #Tiger३. हिंदी, तमिळ आणि तेलुगुमध्ये रिलीज होत आहे. @beingsalmankhan | #ManeeshSharma | @yrf | #YRF50 | #YRFSpyUniverse’. असे पोस्टरच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे.

पोस्टरमधील कॅटरिनाच्या आकर्षक कथानकाने आणि चित्तथरारक लूकने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. मनीष शर्मा दिग्दर्शित ‘टायगर ३’ हा चित्रपट अफलातून असल्याने चाहत्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. यात एजंट झोया आणि टायगरच्या रुपेरी पडद्यावर परतणार असल्याने चाहते खूश झाले आहेत. या वर्षाच्या शेवटी विजय सेतुपतीसोबत कॅटरिनाच्या ‘मेरी ख्रिसमस’ चित्रपटात दिसणार आहे.

हेही वाचा : 

 

View this post on Instagram

 

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif)

Back to top button