Mission Raniganj | ‘अक्षय कुमार’च्या ‘मिशन राणीगंज’ चित्रपटाचं पोस्टर रिलीज | पुढारी

Mission Raniganj | 'अक्षय कुमार'च्या 'मिशन राणीगंज' चित्रपटाचं पोस्टर रिलीज

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूडचा खिलाडी ‘अक्षय कुमार’चा नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. एका सत्य घटनेवर आधारित असणाऱ्या ‘मिशन राणीगंज’ या चित्रपटाचं पोस्टर नुकतचं रिलीज झालं आहे. या चित्रपटात अक्षयसह आणखी काही दिग्गज कलाकारही दिसणार आहेत. चित्रपटाचे पोस्टर रिलीज होण्याआधीच परिणीती चोप्रा आणि अक्षय कुमार यांचे ‘सजा’ हे गाणे रिलीज झाले आहे.  (Mission Raniganj)

कोळसा खाण बचाव मोहिमेवर आधारित असणाऱ्या ‘मिशन राणीगंज या चित्रपटात अक्षय व परिणीतीसह कुमुद मिश्रा, पवन मल्होत्रा, दिव्येंदू भट्टाचार्य, मुकेश भट्ट, अक्षय वर्मा, इश्तियाक खान, दिनेश लांबा आणि वीरेंद्र सक्सेना यांसारखे दिग्गज कलाकार दिसणार आहेत  (Mission Raniganj)

संबंधित बातम्या 

मिशन राणीगंजमध्ये अक्षय साकारतोय ‘ही’ भुमिका

‘मिशन रानीगंज’मध्ये अक्षय कुमारने ‘या’ कोळसा खाण बचाव मोहिमेतील रिअल हिरो जयवंत गिल यांची भूमिका साकारली आहे. २५ सप्टेंबरला या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होणार असून सत्यघटनेवर आधारित चित्रपटाची रंजक कथा प्रेक्षकांना चित्रपटगृहात खिळवून ठेवणार हे नक्की! (Mission Raniganj)

हेही वाचा : 

Back to top button