Akshay Kumar : अक्षयने चित्रपट फ्लॉप होण्याचे सांगितले कारण; म्हणाला माझी चूक… | पुढारी

Akshay Kumar : अक्षयने चित्रपट फ्लॉप होण्याचे सांगितले कारण; म्हणाला माझी चूक...

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार ( Akshay Kumar) त्याच्या ‘सेल्फी’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट २४ फेब्रुवारी रोजी रिलीज झाल्यानंतर बॉक्स ऑफिसवर फार काही चांगली कमाई करू शकला नाही. पहिल्या दिवशी चित्रपटाने २. ५५ कोटीची कमाई केली. यानंतर मात्र, बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट दणकून आपटला. याच दरम्यान अक्षयने त्याच्या करिअरमधील चित्रपट फ्लॉप का होत आहेत? याचा खुलासा केला आहे.

अभिनेता अक्षय कुमारने ( Akshay Kumar ) नुकतेच दिलेल्या एका मुलाखतीत अनेक प्रश्नाची उत्तरे देताना फ्लॉप चित्रपटाबद्दल सांगितले की, ‘माझे अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर फार काळ चालू शकले नाहीत. मध्यंतरी सर्व काही ठीक झाले होते. परंतु, आता ४ ते ५ चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरल्याचे माहिती समोर आली आहे. चित्रपट फ्लॉप होण्यामागे दोष दुसऱ्या कोणाचा नसून माझा स्वत:चाच आहे. प्रेक्षकांची मानसिकता बदलत आहे. चाहत्यांना आता चित्रपटांमध्ये काहीतरी वेगळं बघायचं आहे. त्यासाठी नवीन बदल करणे आवश्यक आहे. यासाठी मी माझ्या परीने सदैव प्रयत्न करणार आहे. असे त्याने म्हटंल आहे.

अक्षय कुमारचे २०२२ साली प्रदर्शित झालेले ‘राम सेतू’, ‘सम्राट पृथ्वीराज’ आणि ‘रक्षाबंधन’ हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी चांगली कमाई करू शकले नाहीत. यानंतर २०२३ मधील त्याचा आणि अभिनेता इमरान हाश्मीचा ‘सेल्फी’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप होत आहे.

हेही वाचा : 

Back to top button