Sanya Malhotra Dream Home : सान्याने गुडगावमध्ये घेतलं ‘ड्रीम होम’ | पुढारी

Sanya Malhotra Dream Home : सान्याने गुडगावमध्ये घेतलं 'ड्रीम होम'

पुढारी ऑनलाईन डेस्क : सान्या मल्होत्रा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. (Sanya Malhotra Dream Home ) तिच्या आगामी चित्रपटामुळे. कारण ती तिच्या आगामी ” कठल ” चित्रपटाच्या रिलीजसाठी तयारी करत आहे. ती पहिल्यांदाच पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. (Sanya Malhotra Dream Home)

चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी, अभिनेत्रीने स्वतःसाठी आणि तिच्या कुटुंबासाठी गुडगाव, दिल्ली येथे 4 BHK घर घेतले. तिने तिच्या सोशल मीडियावर एक खास पोस्ट करून तिच्या नव्या घराची एक झलक दाखवलीय. चाहत्यांनी तिच्यावर अभिनंदनाच्या वर्षाव केला असून तिची स्वप्न पूर्ण केल्याबद्दल कौतुक केलं आहे.

अशोक मिश्रा यांनी लिहिलेले आणि यशोवर्धन मिश्रा यांनी दिग्दर्शित केलेला कठल 19 मे 2023 रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. बालाजी मोशन पिक्चर्स आणि सिख्या एंटरटेनमेंट या बॅनरखाली शोभा कपूर, एकता कपूर, गुनीत मोंगा आणि अचिन जैन यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by SanyaM (@sanyamalhotra_)

 

View this post on Instagram

 

A post shared by SanyaM (@sanyamalhotra_)

Back to top button