त्यावेळी मी चाळीत राहायचो | पुढारी

त्यावेळी मी चाळीत राहायचो

अष्टपैलू अभिनेता मनोज वाजपेयी हा नेहमीच चर्चेत असतो. केवळ चित्रपटच नव्हे, तर आता ओटीटी प्लॅटफॉर्मवरही मनोजने अभिनयाची छाप सोडली आहे. प्राईम व्हिडीओच्या ‘द फॅमिली मॅन’ या वेब सीरिजच्या माध्यमातून त्यांनी ओटीटी विश्वात पदार्पण केले. नुकतेच मनोजने यू ट्यूबवरील द बॉम्बे जर्नी या कार्यक्रमात हजेरी लावली आणि चित्रपटसृष्टीतील प्रवासाबद्दल भाष्य केले. तो म्हणाला, तेव्हा मी दोन लोकांसह एका चाळीच्या खोलीत राहत असे. काही महिन्यांसाठी मी बाहेरगावी गेलो होतो, जेव्हा मी पुन्हा मुंबईत आलो तर तेव्हा त्या खोलीत 10 लोक आले होते. या 10 जणांमध्ये दिग्दर्शक तिग्मांशू धूलिया, विजय आचार्य ही मंडळी होती, हे सर्व मुंबईत चित्रपटात नशीब आजमावण्यासाठी आले होते. मनोजच्या फॅमिलीमॅन या वेब सीरिजच्या तिसर्‍या सिझनची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. याबरोबरच त्यांचा आगामी ‘गुलमोहर’ हा चित्रपट लवकरच डिज्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

Back to top button