उर्फीला कॅबचा धक्कादायक अनुभव | पुढारी

उर्फीला कॅबचा धक्कादायक अनुभव

उर्फी जावेद नेहमीच चित्रविचित्र फॅशनमुळे चर्चेत असते. उर्फी बरोबर आता एक धक्कादायक प्रसंग घडला आहे. सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत उर्फीने याबाबतची माहिती दिली. उर्फीने एका कॅब चालकाच्या विरोधात तक्रार केली आहे. दिल्लीत असताना उर्फीने कॅब बुक केली होती पण याबाबत तिचा अनुभव धक्कादायक होता असे तिने टि्वटमध्ये म्हटले आहे. उर्फीने टि्वटरवर कॅब बुकिंगचा एक स्क्रिनशॉट शेअर केला आहे. माझा उबर सर्व्हिसबरोबरचा सर्वात वाईट अनुभव आहे. मी दिल्लीत होते आणि 6 तासांसाठी मी एक कॅब बुक केली होती. विमानतळावरून परतत असताना मी दुपारी जेवण्यासाठी गाडी थांबवली. यावेळी त्या कॅबचा चालक माझे सामान घेऊन पळून गेला. त्यानंतर माझ्या एका मित्राने मला मदत केली आणि तो चालक कसाबसा परत आला, पण त्यावेळी तो नशेत होता.

Back to top button