BB Marathi -3 : ‘स्नेहाचा मला खूप राग आला’ | पुढारी

BB Marathi -3 : 'स्नेहाचा मला खूप राग आला'

मुंबई; पुढारी ऑनलाईन : बिग बॉस मराठीच्या (BB Marathi -3) घरामध्ये प्रत्येक दिवशी नाती बदलतात. कधी मैत्री होते तर कधी त्याच व्यक्तीशी भांडण देखील होतं. कधी वैर तर कधी त्याच व्यक्तीशी जुळवून घ्यावे लागते. बिग बॉस मराठीमध्ये जोड्या दर आठवड्यात बदलताना देखील दिसतात.

BB Marathi -3 घरामध्ये पहिल्या आठवड्यात अशीच जोडी दिसून आली ती म्हणजे मीरा आणि गायत्री. यामुळे गायत्रीला महेश मांजरेकर यांनी देखील सुनावले  आहे. यात मीराच्या मागे- मागे करण्यात गायत्रीचा वैयक्तिक खेळ कुठेतरी मागे पडतो आहे. मीरा आणि गायत्री आज स्नेहाविषयी बोलताना दिसणार आहेत.

यामध्ये मीरा गायत्रीला म्हणाली, “स्नेहा आणि माझा वाद झाला. कारण ती माझ्याशी उद्धटपणे बोलली.

ती गुपचुपमध्ये कुचळण्या करते आणि मग शांत बसते. मला ती क्यूट बबली दिसतेस असे म्हणाली होती.

म्हणूनच मी तिला इथे काही क्यूट बबली बनायला आले नाहीये असे म्हणाले.

गायत्री म्हणाली, “स्नेहा मानत नाही तिने असं काही केले. मी स्नेहाशी बोलायला गेले होते.

ती म्हणाली, म्हणजे मी काय करू? मी तिला म्हणाले माझं तुला सांगण आहे की, मला तू आवडतेस, तू गोड आहेस. आपलं रिलेशन जर चांगलं रहायला हवं असेल तर माझ्या तोंडावर येऊन बोल. सुरेखा ताईंना देखील तसंच वाटलं होतं.

आम्ही सगळे बसलो होतो त्यांनी मला सांगितले आम्ही सगळ्यांनी ते क्लिअर केलं. स्नेहा माझ्याशी आधी बोलली मग मी तिला उडवाउडवीची उत्तरे दिली असती तर ठीक होतं. यानंतर मग तू मुद्दा काढलास सरांसमोर. मुळात स्नेहाने तो मुद्दा काढायलाच नको होता. तिच्या तोंडातून दोन शब्द नाही निघत कधी, आज पहिल्यांदा मी तिचा आवाज इतका ऐकला इतका”असे गायत्री म्हणाली.

आता हा मुद्दा अजून किती ताणला गेला ? पुढे अजून काय काय झालं ? बघा आजच्या भागामध्ये.

तेव्हा बघत रहा बिग बॉस मराठी सिझन तिसरा दररोज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.

हेही वाचलंत का? 

Back to top button