शमिता शेट्टीवर विचारलेल्या प्रश्नावर राकेट बापटचे नॉटी उत्तर (Video) - पुढारी

शमिता शेट्टीवर विचारलेल्या प्रश्नावर राकेट बापटचे नॉटी उत्तर (Video)

मुंबई; पुढारी ऑनलाईन : राकेश बापटने रविवारी एक इन्स्‍टाग्राम लाईव्हसाठी शमिता शेट्टीला जॉईन केलं. यादरम्यान, दोघांनी फॅन्सची उत्तरे दिली. राकेशला एकाने विचारलं की, जर तुला शमिता शेट्टीचं चित्र काढायचं असेल तर तिला व्हिज्युअलाईज करू शकशील? उत्तरादाखल राकेश म्हणाला, ‘तसं पाहिलं तर हा नॉटी प्रश्न आहे. मी शमिता शेट्टीचे चित्र अशा प्रकारे काढेन की, ती बीचवर आहे. तिच्या समोर समुद्र आहे. हवा तिच्या केसांना स्पर्श करत जात आहे. मला वाटतं की, मी तिला समुद्राला पाहत असताना वाळूवर कॅप्‍चर करेन.’

राकेशचे उत्तर ऐकून शमिता इम्‍प्रेस

राकेशचे हे बोलणे ऐकून ती इम्‍प्रेस होते. ती म्हणते, ‘ऑ, हे खूप सुंदर आहे.’

दरम्यान, राकेशमध्ये सर्वात ॲट्रॅक्‍टिव्ह काय वाटतं? या प्रश्नावर ती म्हणाली, ‘माझ्यासाठी राकेशचा साधेपणा. हेच मला त्याच्याकडे आकर्षित करते.’

राकेशने फॅन्सला दिलं सरप्राईज

लाईव्ह सेशन संपताचं राकेशने फॅन्सना थोडं सरप्राईज दिलं. असं वाटत होतं की, राकेश आणि ती वेगवेगळ्या लोकेशन्‍सहून जॉईन झाले होते. राकेशने सांगितलं की, खरंतर दोघे एकत्र होते.

एका फॅनने विचारलं की, तू आणि ती एकत्र राहत आहात का? यावर शेट्टी जोरजोरात हसू लागली. ती म्हणाली, ‘नाही’. राकेशने देखील सांगितलं की, ‘आता आम्ही केवळ मुलाखतीसाठी एकत्र आहोत. याशिवाय आणखी काही नाही.’

Back to top button