Adipurush : 'या' दिवशी भेटीला; प्रभास-अक्षय कुमार भिडायला तयार - पुढारी

Adipurush : 'या' दिवशी भेटीला; प्रभास-अक्षय कुमार भिडायला तयार

मुंबई; पुढारी ऑनलाईन: राज्याने चित्रपटगृहे उघडण्याचा निर्णय घेताच अनेक चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या तारखा एकामागून एक रिलीज होत आहेत. याच दरम्यान बॉक्स ऑफिसवर प्रभास आणि सैफ अली खानचा आगामी ‘आदिपुरुष’ (Adipurush) चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे.

‘आदिपुरुष’ हा चित्रपट ११ ऑगस्ट २०२२ रोजी रिलीज होणार आहे. पण यातील खास म्हणजे. बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि भूमी पेडणेकर यांच्या ‘रक्षाबंधन’ या चित्रपटाला आदिपुरुष’ (Adipurush) टक्कर देण्यास सज्ज होत आहे.

लवकरच येणार ‘आदिपुरुष’

नुकतेच ट्रेड एनालिस्ट तरण आदर्श यांनी आपल्या ट्विटरवर आगामी ‘आदिपुरुष’ चित्रपटाबद्दल माहिती दिली आहे. यात त्यांनी दाक्षिणात्य अभिनेता प्रभास आणि सैफ अली खान यांचा आगामी ‘आदिपुरुष’ हा चित्रपट ११ ऑगस्ट २०२२ रोजी रिलीज होणार असल्याची घोषणा केली आहे.

तसेच आदीपुरुष या चित्रपटात प्रभास, सैफ अली खानसोबत क्रिती सेनॉन, सनी सिंह या कलाकरांच्या मुख्य भूमिका आहेत, हा चित्रपट हिंदी, तेलगू, तमिळ, कन्नड आणि मल्याळम भाषेत रिलीज होणार असल्याचेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले.

अक्षय कुमारच्या ‘रक्षाबंधना’ला आदिपुरुष देणार टक्कर

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार आणि अभिनेत्री भूमी पेडणेकर यांचा आगामी ‘रक्षाबंधन’ या चित्रपटाची देखील ११ ऑगस्ट २०२२ रोजी रिलीज डेटची घोषणा केली गेली आहे. ‘रक्षाबंधन’ हा चित्रपट आनंद एल. राय यांनी दिग्दर्शित केला आहे.

यामुळे प्रभास- सैफचा ‘आदीपुरूष’ अक्षय कुमारच्या ‘रक्षाबंधना’ला टक्कर देण्यास सज्ज होत आहे.

दोन्हीही चित्रपट एकाच दिवशी रिलीज होण्याची शक्यता आहे. यामुळे चाहत्यांची उत्सुकता शिगेली पोहोचली आहे.

ओम राऊत दिग्दर्शित ‘आदीपुरूष’ या चित्रपटात प्रभासने प्रभू रामाची, क्रिती सेनॉनने सीतेची आणि सैफ अली खानने रावणाची मुख्य भूमिका साकारली आहे. तर या चित्रपटात सनीसिंह लक्ष्मणच्या भूमिकेत दिसणार आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button