Esha Gupta: ईशा गुप्ताने फ्लॉन्ट केली टॉप लेव्हल सेक्सी बॉडी | पुढारी

Esha Gupta: ईशा गुप्ताने फ्लॉन्ट केली टॉप लेव्हल सेक्सी बॉडी

पुढारी ऑनलाईन : ईशा गुप्ता (Esha Gupta) बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये दीर्घकाळ काम करत आहे. तिने आपल्या अभिनयाबरोबरचं फिटनेसकडेही लक्ष दिलंय. प्रत्येक कलाकाराची इच्छा असते की आपण, स्लिम ट्रीम दिसावे. ईशाचं गुप्ता (Esha Gupta) हिचेदेखील तसेच आहे. फिट बॉडी आणि स्टाईल स्टेटमेंटमुळे ती लाईमलाईटमध्ये राहते.

अभिनेत्री ईशाने ‘जन्नत २’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पहिल्यांदा पदार्पण केले.

ईशा गुप्ता नेहमी आपल्या हॉट फोटोंनी सोशल मीडियात धुमाकूळ घालत असते.

याशिवाय ती फिगर फ्लॉन्ट करतानाचे फोटो शेअर करत असते. याच दरम्यान ईशाने नुकतेच एका मुलाखतीत आपल्या दिसण्यावरून खिल्ली उडविली जात होते याचा खुलासा केला आहे.

ईशाने सांगितले की, बॉलिवूडमध्ये जेव्हा मी पाय ठेवले तेव्हा माझे सहकलाकार मला येवून ‘तू खूपच सावळी आहेस, गोरी दिसली पाहिजेच’ असे सल्ले देत होते.

सुरूवातीला ज्यांच्यासोबत मी कामही केले नव्हते, पण ते मला ‘तुम्ही तुमचा मेकअप थोडा गडद करा’ असे सुचवत असल्याचे तिने सांगितले.

यापुढे बोलताना ईशा म्हणाली की, मेकअप आर्टिस्टने सुद्धा जाणून बूजून माझा काळा रंग लपवण्याचा प्रयत्न करत होते. काही वेळा गडद रंगामुळे तिचं संपूर्ण शरीर रंगवले जायचं, काळा रंग सेक्सी किंवा नकारात्मकता दाखवून देत असल्याचे तिने सांगितले आहे.

यशिवाय तिने त्याकाळी गोऱ्या रंगाच्या मुलींना शरीफ मानले जात असल्याचेदेखील म्हटले आहे.

यानंतर ईशा सर्वांना अनोखा सल्ला देत म्हणाली की, आशा आहे की, येणाऱ्या काळात काळा आणि पांढऱ्या रंगाबाबत लोकांच्या मानसिकतेमध्ये बदल झाला पाहिजे. कारण मी आई झाल्यावर मी माझ्या मुलीला काळ्या आणि गोऱ्या रंगावर कोणाची खिल्ली उडवू नका, असे शिक्षण देणार असल्याचे म्हटले. काळानुसार सर्व काही तेव्हा बदलेले असेल असेहीदेखील तिने म्हटले आहे.

ईशाने मिस इंडिया इंटरनॅशनलचा किताब पटकाविला असून सध्या तिच्या सौंदर्याचे लाखो चाहते आहेत.

ती नेहमी आपले हटके फोटोज आणि व्हिडिओ शेअर करून सोशल मीडियावर सक्रिय असते.

जन्नत या चित्रपटात ईशा बॉलिवूड अभिनेत्री इम्रान हाशमीसोबत दिसली होती. यानंतर ती ‘हमशक्ल’ आणि ‘टोटल धमाल’ या गाजलेल्या चित्रपटात दिसली. सध्या ईशा बॉलिवूड अभिनेत्री मल्लिका शेरावतसोबत थ्रिलर वेब सीरिज ‘नकब’ मध्ये दिसणार आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button