पुढारी ऑनलाईन : खतरों के खिलाडी -११ (KKK 11 Winner) या शोचा विजेता जाहीर झाला आहे. चाहत्यांना वाटत होतं की, दिव्यांका त्रिपाठी बाजी मारेल. पण, उलट झालं. खतरों के खिलाडी-११ चा विजेता अर्जुन बिजलानी झाला. पहिल्या टास्कपासून दिव्यांका त्रिपाठी हिने हे सिध्द केलं होतं की, ती सर्वात दमदार आहे. सर्वांना टक्कर देणार आहे आणि ती जिंकायला आलीय. फिनालेपर्यंत बाजी मारत तिने उपविजेतेपद मिळवले. मेल प्रतिस्पर्धक अर्जुनला टक्कर देणारी दिव्यांका विषयी जाणून घेऊया.
सर्व टास्कमध्ये दिव्यांकाचे धाडस पाहून प्रेक्षकांनी तोंडात बोट घातले होते.
दिव्यांकाला 'मगर राणी'चाही दर्जादेखील देण्यात आला होता. परंतु, अखेर अर्जुनचे बाजी मारली.
फिनाले टास्कमध्ये अर्जुन बिजलानीने दमदार परफॉर्मन्स दिला.
दिव्यांका त्रिपाठी हिचा जन्म १४ डिसेंबर, १८८४ रोजी झाला होता.
'ये है मोहब्बतें' मधून ती प्रकाशझोतात आली, अनेक टिव्ही मालिका, जाहिराती आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर तिने काम केलंय. विवेक दहियासोबत तिने विवाह केला.
तिचं बालपण भोपाळमध्ये गेलं. स्टार होण्यासाठी दिव्यांका एका छोट्या शहरातून मुंबईत आली होती.
ती स्पोर्ट्समध्ये ॲक्टिव्ह होती. एनसीसीमध्येही होती. एनसीसीमध्ये तिला बेस्ट कॅडिट म्हणून निवडलं गेलं होतं. इतकचं नाही तिने शूटिंगमध्ये गोल्ड मेडल देखील जिंकलं आहे. तिला आर्मी जॉईन करायचं होतं.
तिला अँकरिंगचं ऑफर मिळाली. तिने ती स्वीकारली. तिने एका मुलाखतीत सांगितलं होतं की, ती एका मध्यमवर्गीय कुटुंबातील होती. तिने कधी विमानाचा प्रवास केला नव्हता.मुंबई ती वडिलांसोबत बसमधून आली होती.
दोन-तीन छोट्या ऑफर्सनंतर दिव्यांकाला टीव्ही मालिका 'बनूं मैं तेरी दुल्हन'मध्ये मुख्य भूमिका मिळाली.
या मालिकेने तिला स्टार बनवलं.
'बनूं मैं तेरी दुल्हन'नंतर ती दीर्घकाळ बोरोजगार राहिली.
ऑडिशन दिलं की रिजेक्ट केलं जायचंय अखेर एका कॉमिक शोमध्ये ती गेली. तर लोक म्हणू लागले की, ती केवळ कॉमेडीचं करू शकते.
२०१३ मध्ये एकता कपूरची टीव्ही मालिका 'ये है मोहब्बतें'मध्ये दिव्यांकाला मुख्य अभिनेत्रीची भूमिका मिळाली.
या मालिकेतून ती हिट झाली. असं म्हटलं जातं की, दिव्यांकाला एका दिवसाच्या एपिसोडचे ९५ हजार ते १ लाख रुपये मानधन मिळायचे.
तिला हाएएस्ट पेड टीव्ही अभिनेत्री म्हटलं जायचं.
खतरों के खिलाडी -११ (KKK 11 Winner) च्या शेवटच्या टास्कमध्ये तीन कंटेस्टेंट्सना एक रेस्क्यू मिशन देण्यात आलं होतं. रोहित शेट्टीने तिघांना सांगितलं होतं की, हा स्टंट एक चित्रपटाच्या क्लायमॅक्सप्रमाणे असेल.
या टास्कमध्ये त्यांना बोटीमध्ये बसून पाण्याच्या मधोमध देण्यात आलेल्या मार्कच्या ठिकाणी जायचं होतं. जेव्हा कंटेस्टेंट मार्कवर पोहोचेल, तेव्हा चॉपर येईल.
चॉपर आल्यानंतर कंटेस्टेंट्सला स्वत:ला त्यांच्या चॉपला हुक करायचं होतं. यादरम्यान, कंटेस्टेंटना बोटीतचं थांबायचं आहे. चॉपर ती बोट घेऊन वर उडेल.
रोहित शेट्टी पुढे म्हणाला की, बोट आणि कंटेस्टेंटला घेऊन चॉपर पुढील मार्ककडे निघून जाईन.
दुसरीकडे मार्कवर कंटेस्टेंट्सना एक जळतं घर दिलेस. चॉपर घराजवळ येईल.
तेव्हा कंटेस्टेंटला बोटीखालील जाळीला असलेली चावी काढून घ्यायची आहे. ती चावी घेऊन तुम्हाला हुक करायंच आहे. आणि पाण्यात उडी मारून स्विमिंग करत जळत्या घराजवळ जाय़चं आहे.
जेव्हा कंटेस्टेंट जळत्या घराजवळ पोहोचतील. तेव्हा आग विझवणारा सिलेंडर, जो लॉक्ड असेल, त्याची चावी कंटेस्टेंटकेड असेल. कंटेस्टेंटला त्या सिलेंडरने आग विझवायची आहे. दरवाजा तोडून आत जायचं आणि आतमध्ये ठेवलेल्या पुतळ्याला घेऊन छताच्या वरपर्यंत जायचं आहे.
कंटेस्टेंट्स वर आल्यानंतर चॉपर त्याच्याजवळ येईल.
तेव्हा खेळाडूला पुतळ्याला आत ठेवून स्वत : चॉपरमध्ये यायचं आणि तिसऱ्या मार्कावर जंप करायचं हाेते.
या टफटास्कमध्ये अर्जुनने कुठलाही वेळ न घालवता टास्क पूर्ण केला. दिव्यांका थोड्या वेळाने मागे पडली.