सांस्कृतिक-धार्मिक वारसा जपा : अरुण गोविल | पुढारी

सांस्कृतिक-धार्मिक वारसा जपा : अरुण गोविल

पुढारी ऑनलाईन; काही दिवसांपूर्वी ‘आदिपुरुष’ या चित्रपटाचा टीझर रीलिज झाला. टीझरमधील व्हीएफएक्स आणि सैफ अली खानच्या लूकला नेटकरी सध्या ट्रोल करत आहेत. रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ मालिकेत रामाची भूमिका साकारणारे अभिनेते अरुण गोविल यांनी एका व्हिडीओद्वारे आदिपुरुष’च्या टीझरवर प्रतिक्रिया दिली आहे.

अरुण गोविल यांनी यूट्यूब चॅनेलवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ‘मी ठरवले की, मी या विषयावर प्रतिक्रिया मांडावी. खूप दिवसांपासून मी बर्‍याच गोष्टींचा विचार करत होतो. ‘रामायण’ आणि ‘महाभारत’ हे सर्व पौराणिक ग्रंथ आणि धर्मग्रंथ हा आपला सांस्कृतिक आणि धार्मिक वारसा आहे. त्याची छेडछाड करणे योग्य नाही. धर्माची चेष्टा करू नये. ही गोष्ट त्यांनी लक्षात ठेवली पाहिजे,’ असे या व्हिडीओमध्ये अरुण गोविल यांनी सांगितले.

Back to top button